घरमुंबईbhaubeej 2021 : भाऊबीजनिमित्त यंदा 'बेस्ट'च्या जादा बसगाड्या

bhaubeej 2021 : भाऊबीजनिमित्त यंदा ‘बेस्ट’च्या जादा बसगाड्या

Subscribe

मुंबईत दिवाळीनिमित्त बाजरपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय. कोरोना रुग्णसंख्य़ा आटोक्यात आल्याने मुंबईत अनेक निर्बंध हटवले जात आहे. त्यामुळे यंदा भाऊबीजनिमित मुंबईत येणाऱ्या आणि आसपासच्या शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ६ नोव्हेंबर रोजी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरातील २७ बेस्ट बस डेपोमधून एकूण १३६ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहे,

कोरोनामुळे गेली दोन वर्षे दिवाळी सणावर अनेक निर्बंध होती. त्यामुळे भाऊबीजनिमित्तही अनेकांना आपल्या नातेवाईकांकडे जात आले नाही. त्यामुळे यंदा कोरोना निर्बंधांतून शिथिलता मिळाल्याने भाऊबीजसाठी आपल्या भावाकडे किंवा बहिणींकडे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

- Advertisement -
bhaubeej 2021 : भाऊबीजनिमित्त यंदा 'बेस्ट'च्या जादा बसगाड्या
bhaubeej 2021 : भाऊबीजनिमित्त यंदा ‘बेस्ट’च्या जादा बसगाड्या

भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरातील बॅकबे, कुलाबा, सेंट्रल, वरळी, वडाळा, आणिक, प्रतिक्षा, धारावी, वांद्रे, सांताक्रुझ, देवनार, शिवाजी नगर, कलिना, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, कुर्ला, मरोळ, मजास, दंडोशी, मागाठाणे, गोरेगाव, ओशिवरा, मालवणी, पोईसर, गोराई, मालाड अशा विविध डेपोमधून मिरा भाईंदर, ठाणेपासून ते शिवडी, वाशी अशा अनके ठिकाणी जाण्यासाठी विविध बसमार्गावर जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

प्रवाशांच्या मदतीसाठी गर्दी असणाऱ्या बसथांब्यावर, तसेच रेल्वे स्थानकांबाहेरील बसथांनकावर बस निरीक्षकांची, वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या जादा बसगाडय़ांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘बेस्ट’तर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -