घरदेश-विदेशआज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा भारत दौरा

आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा भारत दौरा

Subscribe

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दोन दिवसांचा भारत दौरा आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचा दोन दिवसांचा भारत दौरा आहे. आज दुपारी त्यांचे चेन्नई विमानतळावर आगमन होईल. त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जाणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग हेलिकॉप्टरद्वारे महाबलीपुरम विमानतळावर दाखल होतील. महाबलीपुरम येथे या दोन्ही बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. महाबलीपुरममध्ये असलेल्या प्राचीन मंदीरांशी चीनचे वेगळे असे नाते आहे. याच कारणामुळे बैठकीसाठी यावेळी महाबलीपुरम शहराची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – पीएमसी घोटाळ्याला माजी अध्यक्षच जबाबदार?

- Advertisement -

महाबलीपुरमशी चीनचे ऐतिहासिक नाते

महाबलीपुरम शहराशी चीनचे ऐतिहासिक नाते आहे. हे शहर समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. या शहराला पल्लव वंशाचे राजा नरसिंह देव बर्मन यांनी वसवले होते. या शहरात चीनचे नाणी सापडले होते. त्यामुळे चीन आणि या शहराचे व्यापारी संबंध होते, ही बाब स्पष्ट झाले होते. व्यापारी संबंधांमुळे चीन आणि पल्लव वंश यांचे जवळचे नाते बनल्याचे दाखले मिळतात. विशेष म्हणजे सातव्या दशकात चीनेन महाबलीपुरमचे राजा आणि बपल्लवी वंशाचे तिसरे राजकुमार बोधीधर्मासोबत सुरक्षे संदर्भात करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच इतिहासाची आठवण जिनपिंग यांना करुन देणार आहेत. याशिवाय मोदी जिनपिंग यांना महाबलीपुरममधील विविध प्राचीन मंदीर दाखवणार आहेत.

शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

११ ऑक्टोबर (शुक्रवार)

- Advertisement -

दुपारी १२.३० वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चेन्नई विमानतळावर आगमन
दुपारी १२.५५ वाजता : महाबलीपुरम विमानतळावर हेलिकॉप्टरद्वारे आगमन
दुपारी १.३० वाजता : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे आगमन
दुपारी १.४५ वाजता : जिनपिंग विमानतळावरुन आयटीसी ग्रँड हॉटेललारवाना होणार. थोडा वेळ विश्रांतीनंतर जिनपिंग महाबलीपुरमकडे रवाना होणार
संध्याकाळी ५ वाजता : महाबलीपुरम पोहोचल्यावर विविध प्राचीन मंदिरांची पाहणी. या दरम्यान जिनपिंग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट होईल.
संध्याली ६ वाजता : सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
संध्याकाळी ६.४५ ते ८ वाजेपर्यंत : नरेंद्र मोदी आणि जिनपिंग एकत्र जेवण करणार

१२ ऑक्टोबर (शनिवार)

सकाळी १० ते १०.४० वाजता : जिनपिंग आणि मोदी यांची मुलाखत
सकाळी १०.५० ते ११. ४० वाजता : भारत-चीन संबंधावर चर्चा
सकाळी ११.४५ ते १२.४५ : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जेवणाचा कार्यक्रम
दुपारी २ वाजता : शी जिनपिंग चीनला तर नरेंद्र मोदी दिल्लीच्या दिशेला रवाना होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -