घरमुंबईअग्निशमन दलाची पाण्यासाठीची धावपळ संपणार!

अग्निशमन दलाची पाण्यासाठीची धावपळ संपणार!

Subscribe

आगीच्या घटना घडल्यानंतर दूरवरून पाणी आणण्याची अग्निशमन विभागाची समस्या आता सुटणार आहे!

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. परंतु मोठ्या स्वरुपाच्या आगी विझवताना पाण्याचे टँकर आणण्यासाठी जवानांची धावपळ सुरु होते. पण आता मात्र टँकरच्या या अडचणींच्या शर्यतीवर मात करण्यासाठी अग्निशमन दलाने अत्याधुनिक पद्धतीच्या पाणी वहन प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने ३ पाणी वहन प्रणाली वाहनांची खरेदी केली जात असून यामुळे आगीच्या दुर्घटनांपासून अडीच किलोमीटरच्या अंतरावरुनही सहजगत्या आणि कमीत कमी वेळेत पाणी आणून आग विझवण्याचे कार्य करता येणार आहे.

आग विझवायला मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक

मुंबईत आग लागल्यास त्यावर त्वरीत नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याची गरज असते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी सध्या असलेले आगीचे बंब, पाण्याचे टँकर्स, तसेच रस्त्याच्या शेजारी असलेल्या फायर हायडंट्सचा वापर केला जातो. परंतु, मोठ्या स्वरुपाच्या आगीच्या दुर्घटना घडल्यास अग्निशमनाकरता आवश्यक पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि अशा वेळेस परिसरामध्ये उपलब्ध पाण्याचे साठे, तलाव, विहीर किंवा समुद्र यामधून पाणी आणून त्याचा वापर केला जातो.

- Advertisement -

हा व्हिडिओ पाहा – तुमच्या आसपास विजेच्या उघड्या वायर ‘अशा’च पेटू शकतात!

लांबून आणावे लागते पाणी

मुंबईतील बहुतेक फायर हायडंट्स हे नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोगही होत नाही. मुंबई शहरामध्ये समुद्र किनारा, तलाव, विहीर इत्यादी उपलब्ध असून मोठ्या प्रकारच्या आगींच्या दरम्यान या ठिकाणांमधून पाणी घेणे शक्य आहे. तसेच मुंबई शहरातील तलाव, विहीरी किंवा पाण्याचा साठा येथून अग्निशमनाकरता पाणी उपलब्ध होण्याकरता दलाकडे असलेल्या पोर्टेबल पंपाचा उपयोग करण्यात येतो. परंतु या पंपाची क्षमता ७ मीटर खोलीमधून पाणी घेण्याची असल्यामुळे बर्‍याच वेळेस पाणीसाठा उपलब्ध असूनही पाण्याची खोली जास्त असल्याने पंपाद्वारे घेता येत नाही. त्यामुळे दूरवरून टँकरद्वारे पाणी घटनास्थळी आणण्यात येते. परिणामी आग विझवण्याच्या कामाला विलंब होऊन आग अधिक पसरते.

अत्याधुनिक वहन प्रणालीची मदत

परंतु, महापालिकेने ३ अत्याधुनिक अशी पाणी वहन प्रणाली वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांद्वारे दोन ते अडीच किलोमीटरपर्यंतच्या दुर्घटनेच्या परिसरातील उपलब्ध पाण्याचा स्त्रोत कमीत कमी वेळेत दुर्घटनेच्या ठिकाणी आणणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक वहन प्रणालीमध्ये सबमर्सिबल पंप, हायड्ॉलिक ड्ाईव्ह प्रणाली, ३००० मीटर लांबीचा होज, तसेच क्रेन इत्यादीची व्यवस्था आहे. विविध करांसहीत एकूण २२ कोटी ८९ लाख ६० हजार रुपयांमध्ये या तीन वहन प्रणालींची खरेदी करण्यात आली आहे. ब्रिजवासी फायर सेफ्टी सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून या वहन प्रणालीची खरेदी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -