घरताज्या घडामोडी...याामुळे कल्याण डोबिंवलीत कोरोनाच्या संशियत रुग्णांची परवड

…याामुळे कल्याण डोबिंवलीत कोरोनाच्या संशियत रुग्णांची परवड

Subscribe
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांचे हाल होत असून कोणतेही दवाखाने कोरोना रिपोर्ट आल्याशिवाय दाखल करून घेत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. याबाबत कल्याण मधील अंजुमन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आजम शेख यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार करत यामध्ये लक्ष देण्याची विनंती केली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, जे कोरोनाचे संशयित रुग्ण आहेत ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, सर्दी व ताप असतो, ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ८० टक्क्यापेक्षा खाली असते. त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची आवश्यकता असते. अशा रुग्णांनाही खासगी रुग्णालये दाखल करून घेत नाहीत. त्यांच्याकडून कोरोनाचा रिपोर्ट मागवला जात आहे. कोरोनाचा रिपोर्ट येईपर्यंत २४ ते ४८ तासांचा कालावधी लागत असल्याने तोपर्यत रुग्ण शहरातील बऱ्याच दवाखान्यात फिरतो. हा संशयित रुग्ण इकडे तिकडे फिरत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत आहे.

त्यामुळे संशयित रुग्णांद्वारे होणारा कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात संशयित रुग्णांसाठी वेगळ्या दवाखान्यांची व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वेगळ्या दवाखान्यांची व्यवस्था करून त्यांची यादी प्रसिद्ध करावी जेणेकरून रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला कोरोना पॉझिटिव्ह दवाखान्यात ने आण करणे सोपे होईल. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. तसेच खासगी दवाखान्यातून बेसुमार बिलं आकारून रुग्णांची लुटमार सुरू आहे यावर देखील नियंत्रण आणण्याची मागणी अंजुमन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आजम शेख यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -