घरमुंबईभिंतीच्या फटीत अडकलेल्या कुत्र्याची १२ तासांनी सुटका

भिंतीच्या फटीत अडकलेल्या कुत्र्याची १२ तासांनी सुटका

Subscribe

एका भिंतीच्या फटीत अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची तब्बल १२ तासांनी सुखरुप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

एका भिंतीच्या फटीत अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची तब्बल १२ तासांनी सुखरुप सुटका करण्यात आली आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला हे पिल्लू बाहेर काढण्यात यश आले. विरारजवळील आगाशी चाळपेठ गावात गुरुवारी हा प्रकरा घडला होता.

अशी केली पिल्लाची सुटका

विरारजवळील आगाशी चाळपेठ गावातील अनुरोध यांच्या घराच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या फटीत तीन महिन्याचे कुत्र्याचे पिल्लू अडकले होते. बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या पिल्लाचा ओरडण्याचा आवाज आवाज आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बुधवारी सकाळीच त्यांनी अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे जिल्हा अधिकारी मितेश जैन यांना या घटनेबाबत कळवले. त्यानंतर जैन यांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाची मदत घेऊन पिल्लू बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. यासाठी त्यांना तब्बल एक तास लागला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंत तोडून पिल्लाला सुखरुप बाहेर काढले. मात्र, अन्न व पाण्याविना बारा तास उपाशी असल्याने अशक्त झालेल्या पिल्लाला करुणा सामाजिक संस्थेच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला जिवंत जाळले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -