घरमुंबईतब्बल २३ वर्षांच्या मागणीनंतर महापालिका बांधणार पूल

तब्बल २३ वर्षांच्या मागणीनंतर महापालिका बांधणार पूल

Subscribe

माटुंगा रोड रेल्वे स्थानकाजवळील रुपारेल महाविद्यालयाशेजारी पादचारी पूल बांधण्याची मागणी येथील रहिवासी मागील २३ वर्षे करत होते. अखेर महापालिका प्रशासनाला पाझर फुटला आणि माटुंगा रेल्वे स्थानकाशेजारील सेनापती बापट मार्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना रस्ता ओलांडताना होणारा त्रास लक्षात घेऊन याठिकाणी पादचारी पूल उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराचीही नेमणूक केली आहे. याबरोबरच माहिम रेल्वे स्थानक आणि लोकमान्य टिळक हॉस्पिटलसमोरही पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.

तब्बल 4.89 कोटी रुपये खर्च करून हे पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. तिन्ही ठिकाणी वाहतुकीमुळे पादचार्‍यांना रस्ता ओलांडणे जिकरीचे जात होते. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार वाहतूक विभागाच्यावतीने या तिन्ही भागांची पाहणी करून आवश्यकतेनुसार या पादचारी पुलांच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या. त्यामध्ये पात्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

माटुंगा रेल्वे स्थानकाला जोडून पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. परंतु, सेनापती बापट मार्ग ओलांडून जाण्यासाठी पादचारी पूल नसल्याने 1995 सालापासून स्थानिकांकडून याठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी होत होती, तसेच विद्यालयानेही महापालिकेकडे मागणी केली होती. त्यानंतर तब्बल २३ वर्षांनंतर महापालिकेने याठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही याला मंजुरी देण्यात आली होती. परंतु, पुलाचा जिना उतरण्यास पदपथावर जागा नसल्याचे कारण देत महापालिकेने या पादचारी पुलाचे काम गुंडाळून ठेवले होते. परंतु, आता प्रशासनाने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतल्याने स्थानिकांची मागणी मान्य झाली आहे.

लोकमान्य टिळक हॉस्पिटलसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड
खर्च : 4.54 कोटी रुपये
कंत्राटदार : एच.व्ही. कन्स्ट्रक्शन कंपनी

- Advertisement -

माहिम रेल्वे स्थानक, माहिम फाटकाजवळ
खर्च : ४.८९ कोटी रुपये
कंत्राटदार : कुवाला कार्पोरेशन प्रा.लि.

माटुंगा पश्चिम रेल्वेस्थानक, रुपारेल कॉलेजवळ
खर्च : 2.07 कोटी रुपये
कंत्राटदार: लँडमार्क कार्पोरेशन प्रा.लि.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -