घरमुंबईचार हजार मुंबईकर म्हाडाच्या लॉटरीतून बाद

चार हजार मुंबईकर म्हाडाच्या लॉटरीतून बाद

Subscribe

पॅन कार्ड, फोटो आणि बँक तपशील चुकीचा दिला

मुंबईत हक्काच्या घराच स्वप्न पाहणार्‍या ३ हजार ३८५ अर्जदारांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. अर्ज भरताना केलेल्या चुकांमुळेच या अर्जकर्त्यांना यंदाच्या लॉटरी प्रक्रियेतून बाद ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पॅनकार्ड आणि फोटो अपलोडिंगच्या प्रक्रियेत बहुतांश अर्जकर्ते बाद ठरवण्यात आले आहेत. मुंबई मंडळाची जाहिरात पहिल्यांदाच म्हाडा मुख्यालयातील परिसरात काढण्यात येणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठी एकूण १ लाख ५१ हजार ५३२ अर्जदारांनी म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तर म्हाडाकडे १ लाख ९७ हजार अर्ज आले. एकूण १ लाख ४५ हजार ९०९ अर्जकर्त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरली. तर आरटीजीएस आणि एनईएफटीचा पर्याय वापरणार्‍यांची संख्या ही १८५३० इतकी आहे. अर्जाचा भरणा करून अनामत रक्कम न भरणार्‍यांची संख्या ही ३२ हजार ७४४ इतकी आहे. पॅनकार्डचा तपशील योग्य न आढळल्याने २,२९९ जणांचे अर्ज बाद करण्यात आले. तर २,३७२ जणांचा बँकेचा तपशील न जुळल्यामुळे हे अर्ज बाद ठरवण्यात आले. म्हाडाला अपेक्षित फॉरमॅटमध्ये फोटो न पाठवल्याने ५९९ अर्ज म्हाडाकडून बाद ठरविण्यात आले.

- Advertisement -

हे दिवस महत्वाचे
१३ डिसेंबर, सायंकाळी ६ वाजता – सोडतीसाठी स्विकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी
१४ डिसेंबर, सायंकाळी ६ वाजता – सोडतीसाठी मंजुर अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी
१६ डिसेंबर, सकाळी १० वाजता – सोडत
१६ डिसेंबर, सायंकाळी ६ वाजता – सोडतीमधील यशस्वी आणि प्रतिक्षा यादी संकेतस्थळावर जाहीर करणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -