घरमुंबईभारताच्या देवावर चीन सुभेदार!

भारताच्या देवावर चीन सुभेदार!

Subscribe

अगरबत्त्यांसाठी काड्यांची आयात, पाकसमर्थक चीनची भारतामधून ३५०० कोटींची कमाई

भारतातले लोक श्रद्धेपोटी घराघरात अगरबत्ती लावतात; पण ह्या अगरबत्तीसाठीचे सगळे पुण्य हे चीन आणि व्हिएतनामसारखे देश कमावतात. कारण अगरबत्ती तयार करण्यासाठी येणारी काडी ही व्हिएतनाम आणि चीनमधून आयात करावी लागते हे भारतातील अगरबत्ती उद्योगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. भारतात वर्षापोटी सुमारे ३५०० कोटी रुपयांच्या काड्यांची आयात करावी लागते, ही वास्तविकता आहे. पाककडून नुकतेच पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतरही चीनने पाकिस्तानची अप्रत्यक्ष पाठराखण सुरू ठेवली आहे, त्या चीनला कोट्यवधींची कमाई भारतामधून होते, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. देव आपला, श्रद्धा आपली आणि आरती आपली; पण अगरबत्तीसाठी आयात कराव्या लागणार्‍या काडीमुळे पन्नास टक्के पुण्य हे चीनला जाते हे बदलायला हवे, असे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर व्यक्त केले आहे.

मात्र यापुढे अगरबत्तीसाठी काड्या आयात करण्याची परिस्थिती बदलणार आहे असेही त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये आयटीसीच्या माध्यमातून २०० महिलांना रोजगार मिळणार आहे. बांबूपासून या अगरबत्तीच्या १०० टन काड्या महिन्यापोटी तयार करण्यात येणार आहेत. वर्षापोटी १२०० टन अगरबत्तीच्या काड्या तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतात मंगलदीप या ब्रॅण्डच्या नावे या अगरबत्तीच्या काड्या तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठीच राज्य सरकार आणि आयटीसी मंगलदीपमध्ये करार करण्यात आला आहे. पंचतारांकीत हॉटेल्समध्ये दात कोरण्यासाठी वापरात येणारे टूथपीकही कोरियातून आयात होते. भारतात केवळ आसाममध्ये टूथपीक तयार होते. पण मोठ्या प्रमाणावर आयात ही कोरियातून करावी लागते ही वास्तविकता आहे. त्यामुळेच ६० महिलांना काम देऊन महाराष्ट्रात टूथपीक तयार करण्याचे काम आता सुरू झाले आहे. येत्या दोन वर्षात टूथपीक निर्यात करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आयटीसीच्या मंगलदीप या ब्रॅण्डच्या अगरबत्त्यांच्या काड्यांच्या उत्पादनासाठी महिला बचत गटांना जोडण्यासाठी पावले ही चंद्रपूर जिल्ह्यात उचलण्यात येत आहेत. त्यामाध्यमातून बांबू शेती करणार्‍या शेतकरी आणि महिला सक्षम होतील, असे अपेक्षित आहे. बांबू लागवडीचे लक्ष ठेवून ८५ दशलक्ष वापरात नसलेल्या जागेचा विकास बांबूसाठी करता येऊ शकेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

सध्या १ लाख ६५ टन अगरबत्त्यांच्या काड्या या चीनमधून आयात कराव्या लागतात. चीनमध्ये एकट्या बांबू उद्योगाची उलाढाल ही २९ अब्ज डॉलर्स इतकी अफाट आहे. भारतात २०१७ साली इटली, मलेशिया, जर्मनी आणि अमेरिका हे सर्वात मोठे निर्यात करणारे देश म्हणून समोर आले आहेत. एकूण ७४ देशांमधून भारतात १५४.९८ दशलक्ष डॉलर्स इतक्या मूल्याची बांबू आयात करण्यात आली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -