घरमुंबईजे.जे. हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित वॉर्ड

जे.जे. हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित वॉर्ड

Subscribe

जे.जे या सरकारी हॉस्पिटलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी विशेष वातानुकूलित वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले आहे.

जे.जे या सरकारी हॉस्पिटलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी विशेष वातानुकूलित वॉर्डचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले आहे. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते या वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या हेतूने जे.जे हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

खास चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित वॉर्ड

प्रत्येक क्षण रुग्णसेवेसाठी देणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हा विशेष वातानुकूलित वॉर्डचे लोकार्पण करण्यात आले आहे. जेवढा हातभार हॉस्पिटलच्या कामासाठी डॉक्टर्स लावतात. तेवढाच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मोठं योगदान असते. सफाई कामगार, कक्षसेवक, वॉर्डबॉय, लिफ्टमॅन इत्यादी अनेक हातांचे योगदान हे रुग्णसेवेत मोलाची मदत करत असते. कामाच्या अनिश्चित वेळा, जेवणाची होणारी हेळसांड, २४ तास रुग्णांसोबत घडणारा सहवास अशा अनेक गोष्टींमुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव देखील होण्याचे प्रमाण भरपूर असते. हीच बाब लक्षात घेऊन सर. जे. जे. हॉस्पिटलने खास चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित वॉर्ड तयार केला आहे. ज्यात ४ बेड्स असून सर्व सुविधा उपलब्ध असतील, अशी माहिती हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हॉस्पिटलसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असून आम्ही आमच्या वर्ग ४ बांधवांच्या हितासाठी, आरोग्यासाठी नेहमीच तत्पर आहोत.  – डॉ. संजय सुरासे; वैद्यकीय अधीक्षक

सर जे.जे. हॉस्पिटलमधील नर्सिंग होम हे आमच्या हॉस्पिटलचे शक्तीस्थान असून अशा सुविधा असणारे वातानुकूलित वॉर्ड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आल्यामुळे कर्मचारी वर्गात अतिशय आनंदाचे वातावरण असून अधिष्ठातांनी या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेतल्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.  – काशिनाथ राणे; चतुर्थ श्रेणी कामगार संघटनेचे अध्यक्ष

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्याची हवा बदलतेय..


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -