Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई शूssss! मेहता साहेब On Duty!

शूssss! मेहता साहेब On Duty!

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर दोनदा मुदतवाढ मिळून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून १ जुलै २०२० पासून रुजू झाले. प्रशासकीय उलथापालथीनंतर त्यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून ११ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती मिळवून स्वतःची ‘सोय’ लावून घेतली. स्वतंत्र प्राधिकरण असलेल्या महारेराचे प्रमुख झाल्यावरही अजोय मेहता यांचा मंत्रालय मोह ओसरलेला नाही.

तीन महिन्यांनंतरही सहाव्या मजल्यावर आजही त्यांचे दालन आणि त्याबाहेरची नावाची पाटी कायम आहे. कधीकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रभाव टाकणारे अजोय मेहता विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आपल्या मोहजालात गुंतवण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बुधवार १२ मे रोजी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर टिपलेले हे छायाचित्र.

- Advertisement -