घरCORONA UPDATECorona: इमारती, लॉज, धर्मशाळा, जिमखाना, जहाजही पालिकेच्या ताब्यात

Corona: इमारती, लॉज, धर्मशाळा, जिमखाना, जहाजही पालिकेच्या ताब्यात

Subscribe

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मुंबईतील २४ विभागांमध्ये असणारी वस्तीगृहे, लॉज, धर्मशाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, रिकाम्या इमारती, जिमखाना, संस्था, जहाज (क्रूज), महाविद्यालये इत्यादी ताब्यात घेण्याचे निर्देश विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

‘कोरोना’चा संभाव्य धोका लक्षात घेता, भविष्यात या विषाणुची बाधा अनेक लोकांना झाल्यास त्यांना सुरक्षितपणे क्वारंटाइन केंद्रांमध्ये ठेवता यावे, यासाठी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मुंबईतील २४ विभागांमध्ये असणारी वस्तीगृहे, लॉज, धर्मशाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, रिकाम्या इमारती, जिमखाना, संस्था, जहाज (क्रूज), महाविद्यालये इत्यादी ताब्यात घेण्याचे निर्देश मंगळवारी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

‘कोरोना कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतील सर्व नगरसेविका आणि नगरसेवक यांची एक विशेष नियोजन बैठक मंगळवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमधून ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ सुविधेद्वारे नगरसेविका, नगरसेवक सहभागी झाले होते. तर महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त, संबंधित उपायुक्त हे महापालिका मुख्यालयातून या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आयुक्तांनी सर्व नगरसेवकांच्या सुचना जाणून घेत या आजाराचा संसर्ग होण्याची संभाव्यता असलेल्या किंवा लक्षणे असलेल्या व्यक्तींपासून इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. अशा व्यक्तींना १४ दिवस क्वारंटाईन करणे किंवा ज्या परिसरात बाधितांची वा संभाव्य रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा परिसरांना ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करणे, हा याच काळजीचा भाग असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Good News: ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

झोपडपट्टी, चाळींमध्ये ‘होम क्वारंटाईन’ नाही

ज्या व्यक्तींची घरे इमारतीत आहेत किंवा पुरेशी मोठी आहे, अशा व्यक्तींच्या बाबतीत घरातल्या घरात क्वारंटाईन करणे शक्य होऊ शकते. परंतु आकाराने लहान असलेल्या चाळीतील घरात किंवा झोपडपट्टी परिसरात क्वारंटाईन करणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात आले, तरी घर लहान असल्यामुळे घरातील इतर व्यक्तींना किंवा नातलगांना आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या बाबतीत प्रभावी क्वारंटाईनसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

सर्व ठिकाणांची यादी तयार करा

मुंबईतील सर्व २४ विभागांमध्ये असणारी वस्तीगृहे, लॉज, धर्मशाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, रिकाम्या इमारती, जिमखाना, संस्था, जहाज (क्रूज), महाविद्यालये इत्यादी ताब्यात घेऊन त्याठिकाणी क्वारंटाईन करून संबंधितांना ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. जेणेकरून त्या ठिकाणी क्वारंटाईन तयार करून तिथे अशा व्यक्तींना ठेवता येवू शकेल. अशा ठिकाणांचा तपशील गोळा करून यादी तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच तिथे ठेवलेल्या रुग्णांना अन्न, पाणी आदी आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले.

हेही वाचा – सरकारचा यु टर्न; शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही, २ टप्यात वेतन देणार

मुंबईत १४६ ‘कंटेनमेंट झोन’

‘कोरोना कोविड १९’ बाधितांची व क्वारंटाईन आलेल्या व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन संपुर्ण मुंबईत १४६ कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्यांच्या परिसराबाहेर न जाण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेच्या स्तरावर यापूर्वीच करण्यात आले आहेत. या अनुषंगाने जनजागृती तसेच प्रबोधन करण्यासाठी नगरसेविका तसेच नगरसेवक यांचे सहकार्य घेण्याच्याही सुचना आयुक्तांनी केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -