घरमुंबईअंबरनाथ-बदलापूर नवी महापालिका?

अंबरनाथ-बदलापूर नवी महापालिका?

Subscribe

कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच असणार रचना

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदांची मुदत येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार आहे. मात्र, अंबरनाथ बदलापूर नवी महापालिका करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी एक महापालिका उदयास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एक ऑक्टोबर १९८३ साली कल्याण महापालिका अस्तित्वात आली. त्यावेळी उल्हासनगर वगळून, अंबरनाथ- बदलापूरचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर १९९२ ला विभाजन होऊन अंबरनाथ बदलापूर तसेच २० खेडी वगळण्यात आली. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपरिषदांचा स्वतंत्र कारभार सुरू आहे. कल्याण डोंबिवली शहराप्रमाणेच अंबरनाथ बदलापूर दोन्ही शहरांची एकत्रित महापालिका करावी अशा हालचाली गेल्या पाच वर्षांपासूनच सुरू आहेत.

- Advertisement -

अंबरनाथ नगरपालिका आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यासाठी जानेवारी महिन्यात निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याने अंबरनाथ बदलापूर महापालिकेच्या चर्चेला सुरुवात झाली.

अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे लागून असल्याने त्यांच्या एकत्रीत महापालिकेचा विषय गेल्या पाच वर्षापासून चर्चेत आहे. त्यासंदर्भातील महातिी राज्य सरकारकडून संकलीत करण्यात आली आहे. पाच वर्षापूर्वी कोकण आयुक्तांनी पालिकांची पाहणी करून तसा अहवालही सादर केला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांची लोकसंख्या आणि भौगोलिक रचना लक्षात घेता त्या दृष्टीने राज्य शासनाकडूनही अनुकूलता आहे.

- Advertisement -

अंबनाथ आणि बदलापूर दोन्ही महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मागील पाच वर्षे भाजप प्रणित सरकार असल्याने एकत्रीत महापालिकेचा विचार बासनात गुंडाळण्यात आला होता. आता राज्यात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीेचे सरकार स्थानापन्न झाले आहे. त्यामुळे एकत्रीत महापालिकेच्या मागणीला आणखीनच जोर वाढला आहे.

अंबरनाथ बदलापूर एकत्रीत महापालिकेचा निर्णय चांगलाच आहे. शासनाच्या नियमात असेल तर एकत्रित महापालिका होईल. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल.
– डॉ बालाजी किणीकर, आमदार अंबरनाथ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -