घरमुंबईएका क्लिकवर रुग्णवाहिका

एका क्लिकवर रुग्णवाहिका

Subscribe

करोना रुग्णांची मिटणार चिंता

वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेक करोना व अन्य रुग्णांचे मृत्यू मागील दोन महिन्यांमध्ये झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. मुंबईतील या अत्यंत ज्वलंत विषयावर मुंबई उच्च न्यायालयात भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे आता मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील रुग्णांना एका क्लिकवर रुग्णवहिका उपलब्ध होणार आहे.

किरीय सोमय्या यांनी केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश राज्य सरकारकडून पाळण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेची माहिती आणि रुग्णवाहिकेचे प्रत्येक जिल्ह्यातील दरही आता आरटीओच्या https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत. सोमय्या यांनी योग्य वेळी योग्य विषयासंदर्भात याचिका दाखल केल्याने न्यायाधीशांनीही सोमय्या यांचे कौतुक केले आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले असून सध्या मुंबईत 780 नोंदणीकृत रुग्णवाहिकांपैकी 700 रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयाने राज्याला दिलेली आणि अधोरेखित केलेली निवेदने रेकॉर्ड करून स्वीकारली आहेत. राज्य सरकारने रुग्णवाहिकांची गरज असलेल्या रुग्णांवर प्रभावी उपाययोजना सुरू केल्याचेही सांगितले. त्यामुळे भाजपचे उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणी दरम्यान यापुढे जर कोणत्याही खासगी रुग्णवाहिका चालकाने जर नकार दिला तर त्यासंदर्भात तक्रारही दाखल करता येणार आहे. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने हे नमूद केले आहे.

राज्य सरकारने उपलब्ध केलेली सुविधा
– आरटीओ वेबसाइटवरील डॅशबोर्ड कार्यरत
– रुग्णवाहिका माहिती यादी उपलब्ध
– रुग्णवाहिकेसंदर्भात तक्रार असल्यास संपर्क साधता येणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -