घरमुंबईअमेरिकेचा विमानप्रवास होणार स्वस्त

अमेरिकेचा विमानप्रवास होणार स्वस्त

Subscribe

अमेरिकेसाठीचा विमानप्रवास यापुढे ८ हजार रूपयांपर्यंत स्वस्त

पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्याने विमानांच्या इंधन खर्चात बचत होणार आहे. या विमानांचा इंधनखर्च वाचून तिकीट स्वस्त होणार असल्याची शक्यता आहे. म्हणून अमेरिकेसाठीचा विमानप्रवास यापुढे ८ हजार रूपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो.

याकरिता होणार प्रवास स्वस्त

एअर इंडियाची नेवार्क आणि न्यूयॉर्क या दोन शहरांसाठी थेट विमान असून त्याचा मार्ग पाकच्या हवाई हद्दीतून जातो. तर यूरोपच्या दिशेने सेवा देण्याचे काम ब्रिटिश एअरवेज, लुफ्तान्सा, कॅथे पॅसिफिक या कंपन्या देतात. मात्र यांचा मार्गही पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जातो. परंतू, ही हद्द बंद असल्याने या मार्गाने जाणाऱ्या विमानांची सेवा देणाऱ्या कंपन्या दूरच्या मार्गाचा वापर करत असल्याने विमानांना जादाचे इंधन लागत होते. मात्र तो खर्च कमी होणार आहे.

- Advertisement -

इंधनखर्च कमी होणार असल्याने प्रवास स्वस्त

अमेरिकेच्या प्रवासाकरिता प्रत्येक विमानाला २० लाख रूपयांचे इंधन लागत असल्याने या मार्गावरील प्रवासाचे तिकीट ४५ हजार रूपयांच्या घरात होते, पण आता एअर इंडियाचे हे तिकीट आता ३६ हजार ते ३९ हजार रुपयांपर्यंत स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईहून युरोपमार्गे अमेरिकेचा प्रवासही स्वस्त

एअर इंडियाशिवाय इतर कंपन्या म्युनिक, फ्रँकफर्ट व लंडनचा मार्ग स्वीकारत होते मात्र, पाकचे हवाई क्षेत्र बंद असल्याने या विमानांना ऑस्ट्रियातील व्हिएन्नाला जावे लागत होते. यामुळे इंधनखर्च ५ लाख रुपयांनी वाढला असल्याने आता मुंबईहून युरोप दिशेने अमेरिकेत जाणाऱ्या किंवा मुंबईहून युरोपात जाणाऱ्या विमानांचे तिकीटही साधारण ४ हजार रुपयांपर्यंत स्वस्त होणे अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -