Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई "सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है'' म्हणत अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

“सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है” म्हणत अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

अमृता फडणवीस ट्विटरच्या माध्यामातून शिवसेना, महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीक करत असतात.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस वेगवेगळ्या हटके ट्विटमुळे चर्चेचा विषय असतात. मात्र आजही त्या एका नव्या ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी ”सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है” म्हणत ट्विटवर एक नवा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर केक लावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या मजेशीर ट्विटची चर्चा होत आहे. अनेकादा राजकीय वादांवर ट्विट करत अमृता फडणवीस साऱ्यांची फिरकी घेत असतात. तर अनेकदा आपल्या नव्या गाण्यांबाबतची माहिती देत साऱ्यांना अचंबित करतात.

- Advertisement -

मात्र अमृता फडणवीसांचे हे नवे ट्विट कोणत्याही राजकीय विषयावर नाही किंवा नव्या गाण्याबाबतही नाही. तर हे ट्विट अमृता फडणवीस यांच्याच वाढदिवसानिमित्त आहे. ९ एप्रिल २०२१ रोजी अमृता फडणवीस यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर अनेकांना त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले.

या सेलिब्रेशननंतरचा एक फोटो अमृता फडणवीस यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर केकचे टिपके लावलेले दिसत आहेत. हा फोटो त्यांनी फेसबुक आणि ट्विटर अशा दोन्ही अकाउंडवर शेअर केला आहे. दरम्यान अमृता फडणवीस ट्विटरच्या माध्यामातून शिवसेना, महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीक करत असतात. रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरुनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षकरित्या ट्विटरवर निशाणा साधला.

- Advertisement -


 

- Advertisement -