घरमुंबईजाहीरनामे म्हणजे केवळ करमणूक, शब्दच्छल!

जाहीरनामे म्हणजे केवळ करमणूक, शब्दच्छल!

Subscribe

सर्वसामान्यांमध्ये मतदारांमध्ये उदासीनता

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यांवर मतदारांचा फारसा विश्वास उरला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. रायगड मतदारसंघातील मतदारांचा कानोसा घेतल्यानंतर ही बाब पुढे आली. कोणत्याही पक्षाचे जाहीरमाने म्हणजे केवळ करमणूक आणि शब्दच्छल आहेत, अशी प्रतिक्रिया मतदारांनी दिली.

भाजपने सोमवारी ‘संकल्पपत्र’ नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. फारसे नाविन्य नसलेला हा जाहीरनामा म्हणजे शब्दच्छल असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. काँग्रेसने पक्षाचा ‘न्याय’ जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. जाहीरनामे हे केवळ करमणूक असतात, अशी टोकाची प्रतिक्रियाही लोकांमधून व्यक्त होत आहे. सत्तेत असताना पाहिजे त्या योजना राबविणे शक्य असतानाही जाहीरमान्यांतील आश्वासनांची आठवण होत नाही, मात्र निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांची भलीमोठी जंत्री जाहीरनाम्यांतून मांडली जाते, राजकीय पक्षांचे हे जाहीरनामे म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचा उद्योग असल्याची प्रतिक्रिया मतदारांनी दिली.

- Advertisement -

आम्ही तुम्हाला निवडून देतो ते काहीतरी भरीव कार्य करण्यासाठीच, मग वेगळा जाहीरनामा हवाच कशाला, जाहीरनामा म्हणजे प्रलोभने दाखविण्याचा प्रकार असल्याची खरमरीत प्रतिक्रिया निवृत्त प्राध्यापक मदन वाघमारे यांनी व्यक्त केली. तर जाहीरनामा म्हणजे चक्क प्रलोभन असल्याने निवडणूक कायद्यात यावर बंदी तरी पाहिजे किंवा बंधने तरी पाहिजेत, अशी मागणी खासगी क्षेत्रात नोकरी करणार्‍या पंकज माळी यांनी केली.

दरम्यान, रायगड मतदारसंघात युती किंवा आघाडीचे कार्यकर्ते प्रचार करताना जाहीरनाम्याला बाजूला सारून स्थानिक मुद्यांवर भर देत असल्याचे दिसते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मित्र पक्षांचे कार्यकर्ते किंवा नेते भाष्य करीत नसून आपापली मतेच रेटून नेताना पहावयास मिळते, तर दुसरीकडे भाजपच्या ‘संकल्पपत्रा’वर मित्र पक्ष शिवसेनाही काही ‘ब्र’ काढत नाही. स्वाभाविक जाहीर झालेेले जाहीरनामे मतदारापर्यंत प्रभावीपणे कसे पोहचणार, हा प्रश्नच आहे.

- Advertisement -

-उदय भिसे । नागोठणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -