घरमुंबईखुशखबर! मुंबईकरांच्या मदतीला आणखी ८०० एसटी बसेस येणार

खुशखबर! मुंबईकरांच्या मदतीला आणखी ८०० एसटी बसेस येणार

Subscribe

बेस्टच्या ताफ्यात आता 1 हजार एसटी बस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मुंबईकरांची मुंबई उपनगरीय लोकल सेवा प्रवाशांसाठी सुरु झालेली नाही. त्यामुळे बेस्ट बसेसवर मोठ्या प्रमाणात ताण आलेला असून प्रवाशांना खचाखच भरलेल्या बसेसमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता बेस्टच्या ताफ्यात एसटीच्या बसेस दाखल केल्या जात आहेत. बेस्टकडे येत्या १० ऑक्टोबरपर्यंत आणखी ८०० एसटी बस दाखल होणार आहेत. सध्या २०० बस बेस्टला दिल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. या अतिरिक्त बसमुळे मुंबईकरांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.

गेल्या सहा महिन्यापासून सर्व सामान्य मुंबईकरांची उपनगरीय लोकल सेवा बंद आहे. राज्य सरकारने पुन: श्च हरिओमची घोषणा केली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल नेमकी कधी सुरु होणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे प्रवाशांना फक्त बेस्टच्या बसेसवर अवलंबुन राहावे लागत आहे. तसेच बेस्ट बसेसमध्ये गर्दी वाढल्याने बसबाहेर लटकून मुंबईकरांना प्रवास करावा लागत आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बसेस आहेत. परंतु यातील काही गाड्यांचे आयुर्मान संपले आहे. तसेच बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या भाडेतत्वावरील १२०० बसपैकी फक्त ४६० बसच दाखल झाल्या आहेत. बेस्ट दिवसाला ३२०० ते ३३०० बस रस्त्यावर उतरवत आहे. तर बेस्टची प्रवासी संख्या १८ लाखांच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत बेस्टच्या बसची संख्या कमी पडत आहेत. यामुळे बसला प्रचंड गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नाही. पीक अवरवेळी प्रवासी मोठ्या दाटीवाटीने बसमधुन प्रवास करतात, यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे बेस्टच्या बसला होणारी गर्दी पाहता बेस्टच्या मदतीला एसटीच्या एक हजार बस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

- Advertisement -

टप्प्याटप्प्याने दाखल होणार बसेस

मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून महापालिकेने एसटीच्या एक हजार बसेस भाडेतत्वावर घेउन बेस्टच्या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला होता. या एक हजार बसेस टप्प्याटप्प्याने मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २०० एसटी ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्या मुंबईतील बेस्टच्या विविध मार्गावर धावत आहेत. आणखी ८०० बसही दाखल करण्याचा निर्णय झाला आहे. या ८०० एसटी ३, ५, ७ आणि १० ऑक्टोबरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात येतील, अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -