घरमुंबईपरमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीच्या तिसर्‍या गुन्ह्यात अजामिनपात्र वॉरंटसाठी अर्ज

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीच्या तिसर्‍या गुन्ह्यात अजामिनपात्र वॉरंटसाठी अर्ज

Subscribe

खंडणीच्या तिसर्‍या गुन्ह्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर येत्या बुधवारी 10 नोव्हेंबरला किल्ला कोर्टात सुनावणी होणार आहे. यापूर्वी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेसह ठाणे पोलिसांकडून अजामिनपात्र वॉरंटसाठी अर्ज करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले होते. आता राज्य सीआयडीने मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंटसाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

ठाणे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांनी आपल्या पदाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करताना संबंधित व्यापारी आणि व्यावसायिकांवर कारवाईची धमकी देत त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. यातील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील खंडणीचा गुन्हा राज्य गुन्हे शाखेकडे तसेच गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास कांदिवली युनिटकडे आहे. या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावून परमबीर सिंह हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस पथक समन्स देऊन आले.

- Advertisement -

मात्र, ते घरी सापडले नाहीत. त्यामुळे मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांत राज्य गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी किल्ला कोर्टात परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंटसाठी अर्ज केला होता. या अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे परमबीर सिंह यांच्याविरुद्ध यापूर्वी ठाणे कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट काढले आहे. त्यानंतर गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध दुसरे वॉरंट काढण्यात आले. आता राज्य गुन्हे शाखेने त्यांच्या वॉरंटसाठी कोर्टात अर्ज केला आहे. बुधवारी त्यावर सुनावणी होणार असल्याने त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -