घरमुंबई'लोअर परळ'च्या नव्या पूल आरेखनाकरता सल्लागाराची नियुक्ती

‘लोअर परळ’च्या नव्या पूल आरेखनाकरता सल्लागाराची नियुक्ती

Subscribe

'लोअर परळ' पुलाच्या बांधणी करता आरेखनाची आवश्यकता असल्याने पश्चिम रेल्वेने त्याकरता सल्लागाराची नियुक्ती केली आहे. हा पूल पाडण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार असून नवीन पूल उभारणीकरता १० महिने लागणार असल्याची माहिती रेल्वेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोअर परळ येथील रेल्वेच्या हद्दीतील पूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यानंतर हा पूल रहदारीसाठी बंद देखील करण्यात आला. अंधेरी गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे आणि पालिकेने रेल्वे हद्दीतील पुलांचं ऑडीट करायला सुरुवात केली होती. त्यामध्ये लोअर परळचा उड्डाणपूल धोकादायक असल्याचे समोर आले. आता या पुलाची नव्याने उभारणी होत असून या पुलाच्या आरेखनाकरता पश्चिम रेल्वेने सल्लागारांना नेमले आहे. त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच हा पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हा पूल पाडण्यासाठी लागणार तीन महिने

लोअर परळ हा पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेने नुकतीच एका कंत्राटदराची नियुक्ती केली आहे. हा पूल पाडण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे या पुलाची बांधणी करण्याकरता आरेखनाची आवश्यकता असल्याने पश्चिम रेल्वेने त्याकरता सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या पुलाच्या पाडकामाच्या योजनेचा आराखडा रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. या पाडकामाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळेपर्यंत नवीन पुलाच्या आरेखनाचे काम पूर्ण होईल अशी माहिती देखील रेल्वेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

पूल बांधण्यासाठी लागणार १० महिने

लोअर परळ पुलाच्या पाडकामाच्या आरेखनाला अंतिम मंजुरी मिळताच हा नवीन पूल बांधण्यास घेणार आहे. हा पूल बांधण्यासाठी साधारणत: १० महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -