घरमुंबईमुंबई काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत यांचा राजीनामा

मुंबई काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत यांचा राजीनामा

Subscribe

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि सावळ्या गोंधळामुळे मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते अरुण वसंतराव सावंत यांनी राजीनामा दिला आहे. मुंबई काँग्रेसमधून प्रवक्ते पद आणि जबाबदाऱ्यांपासूनही मुक्तता घेतली आहे. अरुण सावंत यांनी स्वतः प्रसिद्धी पत्रक ट्विटरवर शेअर करत हि माहिती दिली आहे. अरुण सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये मागील ६ वर्षांपासून काम करत आहेत. सावंत यांनी मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पक्षामध्ये मोठ्या जोमाने काम करत नेहमी काँग्रेसची मूल्ये आणि तत्त्वे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम अरुण सावंत यांनी केले आहे.

काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे प्रसिद्धी पत्रक जारी करत राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी अरुण वसंतराव सावंत, मुंबई काँग्रेसमध्ये मी मागील ६ वर्षांपासून कॉंग्रेस प्रवक्ता म्हणून पूर्ण क्षमतेने काम करत आहे. या काळात काँग्रेस पक्षाची मूल्ये व तत्वे पुढे नागरिकांपर्यंत पोहचवणे आणि ते पुढे चालू ठेवली आहेत. परंतु अलीकडे काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजीमुळे मी निराश झालो आहे. पक्षात सावळा गोंधळ सुरु आहे. यामुळे मी मुंबई काँग्रेस पक्षातून सर्व पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देऊ इच्छितो यामुळे माझा राजीनामा स्विकारावा असे पत्र अरुण सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध केले आहे.

- Advertisement -

arun sawant resign as Mumbai Congress spokesperson

कोरोना काळातही काँग्रेस प्रवक्ते यांनी चांगले काम केले आहे. कोरोना काळात राज्य सरकारच्या कामांबाबत तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन आणि उपाययोजनांवर अरुण सावंत आढावा घेत होते. तसेच लोकांना कोरोना कळात महत्त्वाच्यी माहिती देण्यातही ते पुढे होते. महाराष्ट्र काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सत्तेत आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला एका बाजूला टाकल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -