घरताज्या घडामोडीaryan khan drugs case: अनन्या पांडे चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल

aryan khan drugs case: अनन्या पांडे चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल

Subscribe

एनसीबीने अनन्या पांडे हिच्या अंधेरी येथील निवासस्थानी छापा टाकला. यावेळी अनन्या पांडे हिचा मोबाईल आणि लॅपटॉप एनसीबीकडून जप्त करण्यात आला.

आर्यन खान (Aryan Khan) यांच्या व्हाट्स अँप चॅट प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey)  हिला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर तिला दुपारी २ वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे अनन्या पांडे वडिल चंकी पांडे यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली असून आता एनसीबी चौकशीत काय घडणार  याकडे सर्वांचे लक्ष आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीला आर्यन खानसोबत अनन्या पांडेचे काही व्हॉट्स अँप चॅट समोर आले होते आणि त्यानंतर अनन्या पांडेला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले.

- Advertisement -

 

बुधवारी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी सेशल कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज व्हॉट्स चॅटचा अहवाला देत फेटाळण्यात आला. या व्हॉट्स अँप चॅट्समध्ये अभिनेत्री अनन्या पांडे हिचे नाव समोर आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी एनसीबीने अनन्या पांडे हिच्या अंधेरी येथील निवासस्थानी छापा टाकला. यावेळी अनन्या पांडे हिचा मोबाईल आणि लॅपटॉप एनसीबीकडून जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे एनसीबीची टिम शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत येथील निवासस्थानी पोहचली. मन्नतवर एनसीबीने छापेमारी केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र मन्नतवर कोणतीही छापेमारी केली नसल्याची माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली.

- Advertisement -

एएनआयएने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानचे ड्रग्ज संबंधित व्हॉट्स अँप चॅट्स न्यायालयात सादर करण्यात आले ज्यात आर्यन खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यात ड्रग्ज संदर्भात संभाषण झाल्याचे पुरावे सापडले. ड्रग्ज क्रूझ प्रकरणात अटक  करण्यात आल्यानंतर आर्यन खानच्या व्हॉट्स चॅटमध्ये तो ड्रग्जच्या कटात सामील असल्याचे समोर आले आणि काल सेशन कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्याने ३० ऑक्टोबर पर्यंत आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा – मन्नत बंगल्यावर एनसीबी टीम का पोहचली ? समीर वानखेडेंनी सांगितले कारण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -