घरमुंबईआणि चालू लोकलमध्येच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या!

आणि चालू लोकलमध्येच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या!

Subscribe

वन रुपी क्लिनिकमध्ये केवळ एक रुपयामध्ये आरोग्याविषयी सल्ला दिला जातो. मात्र आपातकालीन परिस्थितीत इथे प्रसूती देखील केली जाते. अशीच एक घटना मंगळवारी घडली. एका महिलेला अचानक ठाणे स्थानकात प्रसूती कळा सुरु झाल्या. अखेर या महिलेला वन रुपी क्लिनिकमध्ये दाखल करण्कयात आले आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

गर्भवती महिलेला प्रसव वेदना जाणवू लागल्यानंतर तिला वेळीच उपचार न मिळाल्यास गंभीर परिस्थिती ओढवू शकते. तशीच काहीशी परिस्थिती मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिलेवर ओढवली होती. मात्र, रेल्वे पोलिस या महिलेच्या मदतीला धावून आले आणि वन रुपी क्लिनिकमध्ये तिची यशस्वी प्रसूती करण्यात आली. ठाणे स्थानकावर ट्रेन आली असता प्रसव वेदना असह्य झाल्यामुळे सदर महिला तिथेच उतरली. त्या ठिकाणी कोणते रुग्णायल आहे,  याची माहिती तिच्या कुटुंबियांना नव्हती. अखेर रेल्वे पोलीस आणि आसपासच्या प्रवाशांनी त्या गर्भवती स्त्रीला ‘वन रुपी क्लिनिक’मध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वन रुपी क्लिनिकमध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली आणि एका गोंडस मुलीचा जन्म झाला.

नेमके काय घडले?

हरजीत कौर (२३) ही ९ महिन्यांची गर्भवती महिला मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दिव्याहून कळव्याच्या दिशेने प्रवास करत होती. ही महिला प्रसूतीकरता कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात जात होती. मात्र ट्रेनमध्येच अचानक प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली. अखेर ट्रेन ठाणे स्थानकात थांबल्यानंतर ती आणि तिचे कुटुंबिय ठाणे स्थानकात उतरले. त्यांनंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रवासी आणि रेल्वे पोलिसांनी त्या गर्भवतीला ठाणे स्थानकातल्या वन रुपी क्लिनिकमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वन रुपी क्लिनिकमध्ये असलेल्या डॉक्टरांनी हरजीत कौर हिची सुखरूप प्रसूती केली आणि हरजीतने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

- Advertisement -

आतापर्यंत ४ यशस्वी प्रसूती

आपातकालीन परिस्थितीत वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत चार महिलांच्या यशस्वी प्रसूती केल्या आहेत. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रत्येक रेल्वे स्थानकांत वन रुपी क्लिनिक असणे किती महत्त्वाचं आहे हे दाखवून दिले आहे.

वन रुपी क्लिनिक म्हणजे काय?

या क्लिनिकमध्ये केवळ एक रुपयामध्ये आरोग्याविषयी सल्ला दिला जातो. तसेच सवलतीच्या दरात तपासण्या देखील केल्या जातात. या क्लिनिकमध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध असतात. सामान्यपणे इथे प्रसूती केली जात नाही. मात्र तात्काळ उपचारांची गरज पडल्यास प्रसूती देखील केली जाते.

- Advertisement -

हरजीत कौर ही दिवा येथील रहिवासी असून ती कळव्यातील शिवाजी रुग्णालयात प्रसूतीसाठी जात होती‌. पण तिची प्रसूती ठाणे स्थानकात करण्यात आली. त्यानंतर तिला पुढच्या ट्रीटमेंटसाठी शिवाजी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.– डॉ. राहुल घुले , संचालक, वन रुपी क्लिनिक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -