घरमुंबईबाळासाहेबांनी ठरवलं असतं तर मुख्यमंत्री झाले असते...; उपमुख्यमंत्री फडणवीस

बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर मुख्यमंत्री झाले असते…; उपमुख्यमंत्री फडणवीस

Subscribe

मतदारसंघात ज्या जातीचा पगडा असेल त्यांच्याच उमेदवाराला तिकिट दिले जाते. मात्र बाळासाहेब हे कमीत कमी लोकसंख्या असलेल्या जातीच्या उमेदवाराला तिकिट द्यायचे व त्याला निवडून आणायचे. अशी बाळासाहेबांची किमया होती. त्यांनी राजकारणातील जातीय व्यवस्थेचा पगडा पराभूत केला, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईः बाळासाहेबांना विधिमंडळ सभागृहाचा मोह कधीच नव्हता. त्यांनी ठरवलं असतं तर ते या सभागृहात येऊ शकले असते. मुख्यमंत्री होऊ शकले असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. विधिमंडळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या.

ते म्हणाले, बाळासाहेबांचा विधिमंडळात येण्याचे कारण थोडे वेगळे आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सामनामध्ये व्यंगचित्र काढले होते. त्यामुळे आर आर पाटील यांनी हक्कभंग आणला होता. त्यावेळी बाळासाहेब यांनी जबाबदारी न झटकता ते स्वतः हक्कभंग समितीसमोर आले होते. तेव्हा त्यांचा आदर सर्वच करायचे. त्यांना कोणी चहा विचारायचा. तर कोणी गोड त्यांच्यासमोर ठेवायचा. तेव्हा त्यांना विचारायचे बाळासाहेब तुम्हाला गोड चालतना. बाळासाहेब हे विनोदी स्वभावाचे होते. त्यामुळे त्या प्रश्नावर बाळासाहेब म्हणाले, मी पैसे सोडून सर्व काही खातो. त्यानंतर हक्कभंग समितीने बाळासाहेबांना शिक्षा सुनावली. शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सभागृहात सुचना आणली व ती शिक्षा रद्द झाली.

- Advertisement -

बाळासाहेब हे तत्वांचे अत्यंत पक्के होते. त्यांनी एखादा शब्द दिला की तो दिलाच. मग ते माघार नाही घ्यायचे. राजकीय परिणाम काही झाले तरी ते शब्दाला जागणारे होते. त्यांचे राजकारण हे तत्त्वांचे राजकारण होते. प्रत्येक जातीच्या माणसाला त्यांनी संधी दिली. मतदारसंघात ज्या जातीचा पगडा असेल त्यांच्याच उमेदवाराला तिकिट दिले जाते. मात्र बाळासाहेब हे कमीत कमी लोकसंख्या असलेल्या जातीच्या उमेदवाराला तिकिट द्यायचे व त्याला निवडून आणायचे. अशी बाळासाहेबांची किमया होती. त्यांनी राजकारणातील जातीय व्यवस्थेचा पगडा पराभूत केला, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईतल्या समुद्रासारखे बाळासाहेब होते. कधी शांत तर कधी तुफानासारखे संघर्ष करणारे. त्यांची तुलना कोणीच करु शकत नाही. त्यावेळी माझ्यासारख्या छोट्या राजकीय कार्यकर्त्याला त्यांचे विचार प्रेरणा देणारे होते. एका मुलाखतीत बाळासाहेब म्हणाले होते आय एम मॅड हिंदुत्त्ववादी, अशी आठवण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -