घरमुंबईबाळासाहेब ठाकरे गौरव पुरस्कारसाठी केवळ ५ अर्ज!

बाळासाहेब ठाकरे गौरव पुरस्कारसाठी केवळ ५ अर्ज!

Subscribe

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेत उत्कृष्ट काम करणारे प्रभाग समिती अध्यक्ष, सहाय्यक आयुक्त, गुणवंत अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना प्रत्येक वर्षी माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार घोषित करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केले. परंतु बाळासाहेबांच्या जन्मदिनी याची घोषणा करण्याची संधी हुकली असून शुक्रवारी ही घोषणा होणार आहे. परंतु पुरस्कारासाठी १७ प्रभाग समित्यांपैंकी केवळ ५ समित्यांमधून अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे या पाच पैकी एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण प्रभाग समितीची घोषणा या पुरस्कारासाठी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२८ जानेवारीला होणार पुरस्कार वितरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार देण्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व प्रभागांना १० जानेवारीपर्यंत पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करून २३ जानेवारी २०२० रोजी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी मान्यवरांच्या हस्ते महापालिका सभागृहात प्रदान करण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले. परंतु २३ तारखेला या पुरस्काराचे वितरणच काय तर याची घोषणाही महापौरांना करता आलेली नाही. याची अधिकृत घोषणा शुक्रवारी २४ जानेवारी रोजी होणार आहे. तर या पुरस्काराचे वितरण मंगळवारी २८ जानेवारी रोजी होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

- Advertisement -

मागील सन २०१८-१९ या वर्षातील प्रभाग समितीच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी एफ/उत्तर व एफ/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ, एच/पूर्व व पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष सदा परब, एस व टी प्रभाग समिती अध्यक्ष सारीका पवार, आर/मध्य व आर/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा रिध्दी खुरसुंगे, एम/पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष राजेश फुलवारिया आदींचेच अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहे. त्यामुळे या पाच प्रभाग समितींकडून आलेल्या अर्जांचा विचार पुरस्कारासाठी होणार आहे. त्यामुळे या पैंकी एफ/उत्तर व एफ/दक्षिण प्रभाग समितीची या पुरस्कारासाठी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.

असे असतील पुरस्कार

- Advertisement -

उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष – रोख रक्कम ५० हजार रुपये
उत्कृष्टसहाय्यक आयुक्त – ३० हजार रुपये
उत्कृष्ट गुणवंत अधिकारी – ३० हजार रुपये
३ उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी – १० हजार रुपये
३ उत्कृष्ट गुणवंत कामगार – प्रत्येकी ५ हजार रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -