घरमुंबईउल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण

उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण

Subscribe

वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली असून याप्रकरणी महापालिकेच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसाने टोइंगद्वारे मोटारसायकल उचलल्याचा राग मनात ठेवून उल्हासनगर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने वाहतूक पोलिसाला मारहाण केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. शुक्रवारी सायंकाळी उल्हासनगर कॅम्प येथील शिवरोड परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर येथील कॅम्प पी- आणि पी-२ याठिकाणी नो पार्कीग आहे, असे असताना देखील या पार्किंगमध्ये मोटर सायकल चुकीच्या पद्धतीने उभी केली होती. दरम्यान टोइंग वाहनावर नियुक्त असलेल्या पोलीस हवालदार मायकल फ्रान्सिस यांनी ती मोटारसायकल उचलून वाहतूक शाखेच्या मागच्या बाजूला आणली. तिथे काही वेळाने राजेश कांजनीया हा पालिकेचा सफाई कर्मचारी आला. मोटर सायकल का टोईंग केली, असा सवाल त्यांनी वाहतूक पोलिसाला आणि टोइंग कर्मचाऱ्याला विचारला. तसेच ‘मी उल्हासनगर महानगरपालिकेचा सफाई कामगार आहे. माझे वाहन सोडा’, अशी दमदाटी देखील करू लागला. मात्र, फ्रान्सिसने देखील आधी दंड भर आणि नंतर गाडी घेऊन जा, असे राजेशला बजावले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि चिडलेल्या राजेशने फ्रान्सिसला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी राजेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक खरे करीत आहेत.

- Advertisement -

वाचा – वाहतूक पोलिसाला मारहाण

वाचा – टोइंगच्या रागातून कारचालकाची पोलिसाला मारहाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -