घरमुंबईएक मिठी, सहा महिन्यांची शिक्षा

एक मिठी, सहा महिन्यांची शिक्षा

Subscribe

ओळख नसलेल्या तरुणीला तिच्या संमतीविना मारलेली मिठी तुम्हाला तुरुंगात नेऊ शकते. त्याची साक्ष देणारी एक घटना मुंबईत घडली आहे. एका तरुणीच्या संमतीविना तरुणाने तिला मिठी मारली आणि त्याला सहा महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागले आहे.

मिठी मारणे, चुंबन घेणे या तारुण्यसुलभ गोष्टी असल्या तरी सावधान! ओळख नसलेल्या तरुणीला तिच्या संमतीविना मारलेली मिठी तुम्हाला तुरुंगात नेऊ शकते. त्याची साक्ष देणारी एक घटना मुंबईत घडली आहे. एका तरुणीच्या संमतीविना तरुणाने तिला मिठी मारली आणि त्याला सहा महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागले आहे. संदीप जिगराज सिंग असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २८ जुलै २०१७ रोजी अंधेरीत घडली. २५ वर्षांची एक तरुणी रात्री नऊ वाजता टेलरकडे कपडे घेण्यासाठी निघाली होती. त्यावेळी संदीप जिगराज सिंग या ३२ वर्षांचा तरुण तिला न्याहाळत होता. रस्त्यावरून ती तरुणी एकटीच जात असताना स्वत:ला आवरू न शकणार्‍या संदीपने त्या तरुणीला बेसावध गाठून जोरात मिठी मारली. त्या तरुणीने आरडाओरडा केल्यावर संदीप तेथून पळून गेला.

भररस्त्यात केला होता विनयभंग

झालेल्या प्रकरणाने ती तरुणी प्रचंड घाबरली. तिने घरी जाऊन झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्या तरुणीने अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यावेळी आजुबाजूला असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासून काही तासांतच संदीपला अटक केली. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. महानगर दंडाधिकारी एस. सी. पाठारे यांच्या कोर्टात या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. महानगर दंडाधिकारी पाठारे यांनी संदीपला दोषी ठरवून सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

- Advertisement -

एक मिठी, सहा महिन्यांची शिक्षा

एका मिठीची किंमत सहा महिन्यांचा तुरुंगवास ठरली. इतकी मोठी शिक्षा होईल याची संदीपला कल्पनाही नव्हती. पण या निर्णयामुळे तरुणींचा विनयभंग करू धजावणार्‍यांवर चांगलाच वचक बसणार आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संजय घोडवे यांनी या गुन्ह्यांचा तपास केला तर न्यायालयीन कामकाज पोलीस हवालदार संतोष वंजारी यांनी पाहिले.

पोस्कोंतर्गत झाली होती अटक

संदीप सिंगचा हा काही पहिलाच गुन्हा नाही. त्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. त्यामुळे पोस्कोंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने हा दुसरा गुन्हा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -