घरमुंबईदेशासाठी तिने बुडविली परीक्षा

देशासाठी तिने बुडविली परीक्षा

Subscribe

स्वत:च्या हिमतीच्या जोरावर तिने आशियाई सेलिंग चॅम्पियनसाठी थेट जकार्ता गाठले आणि रौप्य पदक पटकावित देशाची मान अभिमानाने उंचाविली. असोसिएशनची मदत नसताना मुंबईची कन्या श्वेता शेरवेगर हिने बजाविलेल्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत असून इतरांसाठी ती नवा आदर्श बनली आहे.

होमिओपॅथिक अभ्यासक्रमाचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष, पण देशासाठी काही तरी करण्याच्या मनातील जिद्दीने तिने त्यावर पाणी सोडले. असोसिएशनची परवानगी नसतानाही स्वत:च्या हिमतीच्या जोरावर तिने आशियाई सेलिंग चॅम्पियनसाठी थेट जकार्ता गाठले आणि रौप्य पदक पटकावित देशाची मान अभिमानाने उंचाविली. असोसिएशनची मदत नसताना मुंबईची कन्या श्वेता शेरवगार हिने बजाविलेल्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत असून इतरांसाठी ती नवा आदर्श बनली आहे. इंडोनेशियामधील जकार्ता येथे आशियाई सेलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या दोन संघांनी भाग घेतला होता. ज्यात मुंबईच्या श्वेेता शेरवगार हिने देखील भाग घेतला होता. मुंबईच्या या मुलीने तिच्या सहकारी सोबत रौप्य पदक पटकावित सार्‍या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

यशस्वी कामगिरी करीत रौप्य पदक जिंकले

श्वेता ही सध्या खारघर येथील येरळा मेडिकल कॉलेजमध्ये होमिओपॅथिकच्या शेवटच्या वर्षात आहे. स्पर्धेच्या दरम्यानच कॉलेजमधील अखेरच्या वर्षाची परीक्षा होती. मात्र, देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची सुवर्णसंधी असल्याने परीक्षेची पर्वा न करता देशासाठी खेळण्याच्या जिद्दीने तिने आपला प्रवास सुरू केला. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसांअगोदर सरावादरम्यान तिला दुखापत झाली. त्यावेळी तिच्या हाताला सहा टाके देखील पडले. पण त्यानंतरही ती थांबली नाही, फक्त जिद्द आणि आकांक्षेपोटी तिने या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत रौप्य पदक जिंकले.

- Advertisement -

स्वबळावर घेतला भाग

गेली १५ वर्षे श्वेता ही सेलिंग करत आहे. श्वेता दिवसातून साधारण रोज चार तास सराव करते. मात्र सरावाकडे जास्त वेळ दिल्यामुळे तिला आपल्या शिक्षणाकडे लक्ष देता आले नाही. नियमानुसार हजेरी पटावर हजेरी कमी असल्याने शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत तिला बसून दिले नाही. मात्र, तिने सेलिंगमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायच्या स्वप्नाला कुठेच तडा लागू दिला नाही. असोसिएशनने देखील श्वेताला मदत केली नाही. पण ती खचली नाही, स्वत:च आठ ते नऊ लाखांचा निधी गोळा करीत स्पर्धेत भाग घेत तिने ही यशस्वी कामगिरी केली. या संदर्भात तिने सरकार दरबारी देखील विनंती केली होती, पण यामध्ये सुद्धा तिला अपयशच हाती लागले.

या अगोदरही अनेक स्पर्धा गाजविल्या

यासोबतच तिने नेदरलँड, स्पेन, पोर्तुगालसारख्या अनेक देशांत जाऊन भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आतापर्यंत तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण ३० स्पर्धांत भाग घेतला असून यातील ७ स्पर्धांसाठी तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. या सोबतच गेली काही वर्षे सी कॅडेट कॉर्पस या स्वयंसेवी संघटनेशी देखील ती जोडलेली होती.

- Advertisement -

ऑलिंपिकमध्ये जाऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व तिथे करावे ही माझी इच्छा आहे. माझ्या या यशामध्ये माझ्या परिवाराचा महत्वाचा वाट आहे. या सोबतच माझेे प्रशिक्षक पीटर कॉन्वेय आणि अनिष वैद्य यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे सगळे शक्य नव्हते. या सोबतच शासनाने देखील यावर लक्ष दिले पाहिजे की, जो खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतोय त्याला काही सवलती देखील पुरवल्या पाहिजेत. – श्वेता शेरवगार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -