घरमुंबईबेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरपासून बेमूदत संपावर

बेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरपासून बेमूदत संपावर

Subscribe

बेस्ट कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ९ ऑक्टोबरपासून बेमूदत संपावर जाणार आहेत.

वारंवार संप आणि बैठका घेऊनही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. प्रत्येक बैठकीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात फक्त आश्वासने पडत आली आहेत. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ९ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा बेमूदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदर २०१९च्या सुरुवातीला बेस्ट कर्मचाऱ्यांचा तब्बल ८ दिवसांचा ऐतिहासिक संप झाला होता. हा संप हायकोर्टाच्या आदेशानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. वेतन करार आणि करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मासिक अंतरिम वाढ, सानुग्रह अनुदान सारख्या अनेक मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरपासून संपावर जात आहेत. संपाबाबत बेस्ट उपक्रमाला नोटीसही देण्यात आली असल्याची माहिती कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – BMC Budget : बेस्टसाठी फक्त ४४ कोटींची तरतूद!

- Advertisement -

 

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांचा मागण्या?

  • बेस्ट उपक्रमने बेस्ट वर्कर्स युनियनबरोबरच वाटाघाटी करुन अंतिम करार करावा.
  • बेस्टचे अस्तित्व राखण्यासाठी बेस्ट उपक्रमासाठी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या “क” अर्थसंकल्पाचे “अ” अर्थसंकल्पात विलानीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करा.
  • एप्रिल, २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना समपातळीवर आणण्यासाठी उर्वरित दहा वेतनवाढी तात्काळ लागू करा.
  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणी पत्रावर चर्चा सुरू करून तातडीने वेतन करार करा.
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकित कायदेशीर देणे तात्काळ रद्द करा.
  • विद्युत विभागातील कॅज्युअल कामगारांना तातडीने कायम करा, ग्रॅज्युइटी ठरविताना कॅज्युअल सेवेचा काळ गृहीत धरून देणी द्या.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -