घरCORONA UPDATEपावसामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल, विश्रांतीगृहात शिरलं पाणी!

पावसामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल, विश्रांतीगृहात शिरलं पाणी!

Subscribe

मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट ओळखली जाते. या कोरोनाच्या संकटकाळात बेस्टचे कर्मचारी पावसाळामध्ये अहोरात्र परिश्रम घेत आहे. मात्र या बेस्टच्या कोरोना योद्ध्यांना कसलीही बेस्टकडून सुविधा मिळत नाही. शनिवारी झालेल्या पावसामुळे कन्नमवार नगरच्या बेस्टचा विश्रांती गृहात पावसाचे पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले आहे. त्यामुळे बेस्ट प्रवाशांनाच्या या कारभारावर कर्मचाऱ्रीयांनी संताप व्यक्त केला.

व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल 

कोरोना महामारीच्या काळात मुंबई शहरांमधे वीजपुरवठा आणि बृहन्मुंबई परिसरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक या सेवा सातत्याने देण्याचे काम बेस्ट कामगार करत आलेले आहेत. सेवा देत असताना शेकडो बेस्ट कामगार कोरोनाची लागण झाली आहे. यात काहीचा दुर्दैवाने मृत्यू सुद्धा झालेला आहे. तरी सुद्धा आपल्या जीवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता बेस्ट कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून आपली सेवा देत आहे. मात्र बेस्टच्या अनेक आगारांमध्ये चालक-वाहकांना विश्रांती करण्यासाठी सुविधाच नाही. कुठे बाकडे आहेत, तर पंखा नाही. कुठे पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्थाच नाही. तेथे चार भिंतीच्या आत काही प्रमाणात चालक-वाहकांना सुरक्षित तरी वाटते. परंतु  कन्नमवार नगरमधील बेस्टच्या चौकीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बेस्टच्या कन्नमवार नगर येथील विश्रांती गृहात पावसाचे पाणी शिरल्यामुळे कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. पाणी शिरल्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बाकड्यावर विश्रांती करावी लागली आहे. यासबंधीत एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर बेस्टच्या कारभार चांगलाच संताप व्यक्त केला आहे. बेस्टकडून नेहमी पावसाळ्यापूर्वी प्रत्येक वर्षी लाखों रुपये खर्च करून, बेस्टच्या चौक्या, विश्रांतीगृह, बेस्टचे बस स्टॉपची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते.  मात्र पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे असते, प्रत्येक वर्षी हे रडगाणे असेच सुरु आहे.

- Advertisement -

कन्नमवारनगरमध्ये बेस्टच्या विश्रांतीगृहात शिरले पावसाचे पाणी, कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल

कन्नमवारनगरमध्ये बेस्टच्या विश्रांतीगृहात शिरले पावसाचे पाणी, कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, July 5, 2020

बेस्ट कामगाराने व्यक्त केला संताप

बेस्ट प्रशासनाने बेस्ट कामगार हा कोविड योद्धा म्हणून त्यांची ख्याती बनली आहे. पण त्याच्याकडे गेले प्रत्येक  वर्षे पावसाळ्यात चौकीकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. देशभरात स्वछता अभियान चालविले जाते आणि पण बेस्ट कर्मचाऱ्याच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. आज अनेक आगारात पिण्याच्या पाण्याचे नळ व पाण्याची टाकी नाही, तेथे कधीच वेळेवर साफ सफाई होत नाही. त्यामुळे अशा कठीण परिस्थिती बेस्टच्या या योंद्धाना मरण्यासाठी बेस्ट प्रशासनाने सोडले आहे असा संताप बेस्ट कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बेस्ट प्रशासन नुसते कामराची पिळवणून करत त्यांना कुठलीही सुविधा देत नाही. मात्र त्यांना कोरोना योंद्धा म्हणून त्यांना लढायला पुढे पाठवतात, एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवर जाऊन देशाच्या जवानांना धेर्य देतात, तर दुसरीकडे बेस्टचे सर्व अधिकारी आपल्या दालन बसून आहे. त्यांना कामगाराना होणाऱ्या  असुविधेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने तात्काळ यावर लक्ष देऊन  कन्नमवार नगरची बेस्टची चौकी दुरुस्त करावीत.
– सुनील गणाचार्य, वरिष्ठ सदस्य,  बेस्ट समिती

 

- Advertisement -

हे ही वाचा – यंदा कोकणात घरोघरी जाऊन भजनं होणार नाहीत,’या’ ग्रामपंचायतीने घेतला निर्णय!


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -