घरमुंबईबेस्ट कामगार संप होणार कि नाही?

बेस्ट कामगार संप होणार कि नाही?

Subscribe

बेस्ट प्रशासनाबरोबर आज होणार अंतिम बैठक

बेस्ट कर्मचार्‍यांनी प्रलंबित वेतन करार आणि इतर मागण्यासंदर्भात ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मात्र बेस्ट प्रशासनाने बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीबरोबर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदत मागितली होती. ही मुदत आज संपली असून आतापर्यंत बेस्ट प्रशासनाने बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीबरोबर चार बैठका झाल्या असून शेवटची बैठक मंगळवारी होणार आहे. त्यानंतर बेस्ट कामगारांचा जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्यात कृती समिती बेस्ट संपाची रुपरेषा ठरवणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे बेस्टच्या कामगार मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.

बेस्ट कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्या घेऊन जानेवारी महिन्यात ९ दिवसांचा ऐतिहासिक संप केला होता. हा संप इतका मोठा होता की, राज्य सरकारने या संपाची दखल घेतली होती. त्यानंतर कोर्टाच्या मध्यस्थीने तो संप मिटला. त्यावेळी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या आदेशानुसार कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासनाने बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर वेळोवेळी चर्चा करणे आवश्यक होते, पण प्रशासन टाळाटाळ करत असल्यामुळे कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मात्र बेस्ट प्रशासनाने बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीबरोबर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी २०ऑगस्टपर्यंत मुदत मागितली होती. यासंबंधी लेखी आश्वासन देण्यात आले होते. ज्यामध्ये 9 ते २० ऑगस्ट या 10 दिवसांत बेस्ट प्रशासनाबरोबर बेस्ट कृती समितीच्या पाच बैठका होणार होत्या. मात्र आतापर्यंत चार बैठका झाल्या असून पाचवी बैठक मंगळवारी होणार आहे. त्यानंतर बेस्ट कामगारांचा जाहीर मेळावा घेण्यात येणार असून यावर बेस्ट कर्मचार्‍यांबरोबर चर्चा करुन संपाविषयी निर्णय घेण्यात येेणार आहे.

- Advertisement -

बेस्ट कामगारांचा प्रलंबित वेतनकरार व इतर मागण्यासंदर्भात आतापर्यंत चार बैठका बेस्ट प्रशासनाबरोबर झाल्या आहेत. शेवटची बैठक मंगळवारी होणार आहे. त्यानंतर संपाविषयी अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्या, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता बेस्ट कामगारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. श्रीकृष्ण मंदिर सभागृहात हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात कामगार जो निर्णय घेतील तोच अंतिम निर्णय असेल असे बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीच्या शशांक राव यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -