घरमुंबईभाईंदर ते विरार रेल्वे सेवा ठप्प

भाईंदर ते विरार रेल्वे सेवा ठप्प

Subscribe

धुवाधार पावसामुळे नालासोपारा, विरार आणि वसई परिसर जलमय झाले आहेत. या ठिकाणातील पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरु आहे. मात्र रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने भाईंदर ते विरार रेल्वे सेवा ठप्प असून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सलग तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. मात्र मंगळवारी मध्य रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु नालासोपारा, वसई आणि विरार परिसरात पावसाने जोरदार बॅटींग केल्यामुळे या ठिकाणी साचलेले पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानक पाण्याखाली गेल्याने भाईंदर ते विरार रेल्वे वाहतूक अद्यापही ठप्प असल्याचे चित्र दिसत आहे. या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी २० पंप लावण्यात आले आहेत. तर आज सकाळी विराहून चर्चगेटसाठी ट्रायल रन घेण्यात आली. नालासोपारा स्थानकावर २०० मिमी तर विरार रेल्वे ट्रकवर १५० मिमी पाणी साचले असल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -