घरमुंबईखासगी सोसायटींमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी मोफत करा

खासगी सोसायटींमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी मोफत करा

Subscribe

अनेक चाळी, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जागेत असणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीसाठी महापालिकेच्यावतीने अवाजवी दर आकारला जातो. ते दर नागरिक आणि गृहनिर्माण सोसायटींना परवडत नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने खासगी मालमत्तेमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी मोफत करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे.

मुंबईतील रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेच्यावतीने केली जात असली, तरी मागील दोन महिन्यात पावसाळ्यात पडलेली अनेक झाडे आणि त्यांच्या फांद्या पडून ज्या दुघर्टना झाल्या आहेत. या खासगी सोसायटीतील जागांमधील आहेत. खासगी सोसायटींमधील झाडांच्या फांद्या कापण्यास महापालिकेच्यावतीने परवानगी मिळण्यास होणारा विलंब आणि त्यासाठी आकारला जाणारा शुल्क यामुळे या झाडांच्या फांद्यांची होत नाही. त्यामुळे खासगी सोसायटींना वृक्षरोपण करण्यास महापालिकेच्यावतीने प्रोत्साहन दिले जात असल्याने या खासगी मालमत्तेवरील झाडांची छाटणी महापालिकेने मोफत करावी ,अशी मागणी आता नगरसेवकांकडून होऊ लागली आहे.

झाडांच्या फांद्या छाटणीसाठी अवाजवी दर

राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. महापालिकेच्यावतीने रोपवाटिकांमधून रोपे घेऊन ती रस्त्यांच्याकडेला लावण्याचे कार्य काही पर्यावरणविषयक काम करणार्‍या संस्था करत असतात. मात्र, मुंबईत वृक्षारोपण करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जागांवर लावलेली झाडे वाढल्यानंतर त्यांची महापालिका मोफत छाटणी करते. मात्र, खासगी मालमत्तेमधील झाडांची छाटणी मोफत करत नाही. मुंबईत अनेक चाळी, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जागेत असंख्य जुनाट वृक्ष आहेत. या झाडांच्या फांद्या छाटणीसाठी महापालिकेच्यावतीने अवाजवी दर आकारला जातो. जे नागरिक आणि गृहनिर्माण सोसायटींना परवडत नाही. त्यामुळे ते झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे महापालिकेच्यावतीने खासगी मालमत्तेमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी मोफत करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे. याकरता महापालिकेच्या धोरणात बदल करण्याची मागणी गंगाधरे यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील एक लाख झाडांच्या फांद्यांची छाटणी, तरीही पडझड सुरुच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -