घरमुंबईऑनलाईन सभेत काँग्रेस नगरसेवकाचे अश्लील चाळे, भाजप नगरसेविकेचे आरोप

ऑनलाईन सभेत काँग्रेस नगरसेवकाचे अश्लील चाळे, भाजप नगरसेविकेचे आरोप

Subscribe

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेची अर्थसंकल्पावरील ऑनलाईन सभा शुक्रवारी सकाळी सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक विरेंद्र चौधरी हे एका महिलेशी अश्लील चाळे करताना आढळून आले, असा खळबळजनक आरोप भाजपच्या नगरसेविका रिटा मकवाना यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी याप्रकरणी जबाबदार नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांच्या विरोधात महापौर किशोरी पेडणेकर व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे लेखी तक्रार करीत चौधरी यांचे नगरसेवक पद रद्द करावे व त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

शुक्रवारी सकाळी११ वाजताच्या सुमारास पालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पावर ऑनलाईन सभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी काँग्रेस नगरसेवक वीरेंद्र चौधरी हे एका महिलेशी अश्लील चाळे करताना मला व भाजपच्या नगरसेविका सरिता पाटील यांना आढळून आले. त्यामुळे ह्या किळसवाण्या व भयंकर घटनाप्रकाराबाबत रिटा माकवाना यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

सदर घटनाप्रकार आम्ही स्वतः पाहिला असून याप्रकरणी पालिकेने ऑनलाईन सभेची रेकॉर्डिंग तपासल्यास सदर घटनाप्रकार सर्वांसमोर उघडकीस येईल, असे रिटा माकवाना यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी, नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांना पत्रकारांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संपर्क होऊ शकलेलला नाही.

बेस्टचा अर्थसंकल्प मात्र रखडला

मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ चा ३९०३८.३८ कोटींचा अर्थसंकल्प ऑनलाईन सभेअंतर्गत साधकबाधक चर्चेअंती मंजूर करण्यात आला. मात्र बेस्ट उपक्रमाचा १८८७.८३ कोटीं रुपये तुटीचा अर्थसंकल्प पालिकेने अनुदान न दिल्याने मंजुरीअभावी रखडला आहे. मुंबई महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पावर गेल्या चार दिवसांपासून ऑनलाईन सभेअंतर्गत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी चर्चा केली. यावेळी, नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील काही खात्यांच्या तरतुदीबाबत आक्षेप घेऊन काही सूचना केल्या. तर काही नगरसेवकांनी निधी तरतुदीबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -