घरमुंबईमुख्याधिकारी यांच्या दालनात भाजप नगरसेवकाचा राडा

मुख्याधिकारी यांच्या दालनात भाजप नगरसेवकाचा राडा

Subscribe

अंबरनाथ नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामावर नाराज झालेल्या भाजप नगरसेवक सुनील सोनी यांने मुख्याधिकारी सहित अन्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी देत खुर्ची उचलून मारण्याचा प्रयत्न केला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामावर नाराज झालेल्या भाजप नगरसेवक सुनील सोनी याने मुख्याधिकारी सहित अन्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी देत खुर्ची उचलून मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सोनी यांच्या विरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दमदाटी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मंगळवारी सकाळी मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी शहरातील अंबरनाथ भागातील स्वच्छतेबाबत भाजप नगरसेवक सुनील सोनी यांच्या तक्रारीवरून तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या उपमुख्याधिकारी कर्मचाऱ्यांद्वारे नीट काम होत नाही, काही कर्मचारी नेहमी गैरहजर असतात आणि त्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी का सुट्टी दिली जाते? अशा तक्रारी सुनील सोनी यांनी केल्या. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पवार यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला, असता सोनी यांनी शिवीगाळ करून खुर्ची उचलून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या उपमुख्याधिकारी भाऊ निपुरते, शहर अभियंता मनीष भामरे, शाखा अभियंता प्रवीण बिर्ला यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनील सोनी यांनी मुख्याधिकारी यांना शिवीगाळ करून खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर देखील सोनी यांनी आरोग्य सभापती उत्तम आयवळे यांच्या दालनात मुख्याधिकारी पवार यांना बोलावून त्यांच्यावर दडपण आणून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी सोनी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोचरेकर हे करीत आहेत. यापूर्वी देखील सोनी यांच्यावर नगरपालिका अधिकाऱ्यांना धमकी देण्याचे आरोप करण्यात आले होते. या संदर्भात सुनील सोनी यांना विचारले असता ते म्हणाले की, गेल्या आठवड्यापासून मी माझ्या प्रभागातील स्वच्छतेबाबत तक्रारी करून सतत पाठपुरावा करीत आहे. मात्र, मला समाधानकारक उत्तरे मिळत नाही, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अंबरनाथमधील जीआयपी धरणाला भगदाड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -