घरताज्या घडामोडीअल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजपा वचनबध्द - प्रविण दरेकर

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजपा वचनबध्द – प्रविण दरेकर

Subscribe

देशातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कटीबध्द आहे. परंतु भाजप हा अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचा अपप्रचार राजकीय विरोधक नेहमी करतात. परंतु राजकीय विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरीही भाजपा खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी वचनबध्द असल्याचा निर्वाळा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

भाजप महाराष्ट्र अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने आज उत्तन येथे प्रदेश प्रशिक्षण वर्ग आणि कार्यकारिणी बैठक विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, आजच्या कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने आपल्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पध्दतीला भाजपमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक क्षेत्रात तसेच राजकारणातही प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सर्वप्रथम भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी अभियान सुरू करण्याची आवश्यकता आहे. या समाजाच्या प्रलंबित समस्या, त्यांच्या अडचणी दूर करुन त्यांच्या विकासासाठी काय केलं पाहिजे, त्याचा निश्चित आराखडा तयार करण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी ३-४ टीम करून या सर्व गोष्टींचा आढावा दर ३ महिन्यांनी घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभलं आहे. भाजपामध्येही अल्पसंख्यांक नेतृत्वाचा मान राखण्यात आला. त्यांचे अनेक मंत्री झाले. भाजपाने प्रत्येक समाजाला नेतृत्व दिले. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्याला जनसेवेची संधी मिळाली. पण तरीही भाजपच्या विरोधात अल्पसंख्यांक समाजामध्ये वातावरण तयार करण्याचे काम विविध राजकीय पक्षांनी केले. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक समाजासाठी सुरु करण्यात आलेल्या योजना व प्रकल्प तसेच त्यांच्या कल्याणासाठी व विकासाठी सुरु असलेली कामं त्यांना समजून सांगण्याची. तसेच या समाजाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

भाजापा महाराष्ट्राच्या अल्पसंख्यांक मोर्चाने पुढाकार घेतला पाहिजे, बेरोजगार तरुणांना दिशा देण्याची जबाबदारी आमची आहे. विद्यार्थी, तरूणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धती काम करत आहे हे नीट समजून सांगण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आदराचं स्थान आहे. आज महाराष्ट्राचे नेते केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यातून सुद्धा आपल्याला विकास, उद्योग धंदे कसे उभारता येईल याचे प्रशिक्षण करण्याची आवश्यकता आहे. असेही दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी भाजापा महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इजाज देशमुख, भाजपा मुंबईचे महामंत्री संजय उपाध्याय, मुंबई अध्यक्ष वसीम खान, महाराष्ट्राचे महामंत्री जुनेद खान, अतिक खान, अल्पसंख्याक मोर्चाच्या महिला अध्यक्षा सुलताना खान आदी मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा – पुढच्या महिन्यात ‘या’ तारखेला होणार आरोग्य विभागाच्या परीक्षा – राजेश टोपे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -