घरताज्या घडामोडीपुढच्या महिन्यात 'या' तारखेला होणार आरोग्य विभागाच्या परीक्षा - राजेश टोपे

पुढच्या महिन्यात ‘या’ तारखेला होणार आरोग्य विभागाच्या परीक्षा – राजेश टोपे

Subscribe

आरोग्य विभागाची परीक्षा या महिन्यात २५ आणि २६ सप्टेंबरला होणार होती. पण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील चुकीच्या माहितीमुळे राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही परीक्षा रद्द झाली नसून पुढे ढकलण्यात आली आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना आज स्पष्ट केले. लवकरच पुढील तारीख ठरवली जाईल. ऑक्टोबरच्या १५, १६ किंवा २२, २३ तारखेला परीक्षा होऊ शकते, असे टोपे म्हणाले.

नक्की काय म्हणाले टोपे?

राजेश टोपे म्हणाले की, ‘आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द नाहीतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढे का ढकलण्यात आल्या याचे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थी हित हाच महत्त्वाचा विषय होता. कारण शेवटी एक असतं, काही पाच -पन्नास, शंभर किंवा दोनशे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला किंवा त्यांना वंचित राहावं लागलं तरी सुद्धा ते निश्चित प्रकारे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. म्हणूनच ही भूमिका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.’

- Advertisement -

‘दरम्यान शनिवारी, रविवार सुट्टीचा दिवस होता. मात्र सोमवारी पहिल्या वर्किंग डे दिवशी लगेच ११ वाजता या संदर्भात आमचा विभागाचे अॅडिशनल चीफ सेक्रेटरी डॉ. व्यास, हेल्थ कमिशनर रामास्वामी, डायरेक्टर अर्चना पाटील हे सगळे उपस्थितीत राहून न्यासासोबत बैठक घेतील. त्यानंतर पुढील तारखा ठरवल्या जातील. कुठल्याही परिस्थितीत येणारी जी तारीख असेल, दोन-पाच दिवस जास्त लागले तरी हरकत नाही, पूर्ण ऑडिट करून सर्वोनुमते चर्चा करून आम्हाला निर्णय कळवतील. त्यानंतर आम्ही यासंदर्भात निर्णय घेऊ. ऑक्टोबरच्या १५, १६ किंवा २२, २३ तारखेला परीक्षा होऊ शकते. जर १५ ची जी रेल्वेची परीक्षा आहे, ती जर पुढे ढकलता आली, तर आपल्याला १५, १६ परीक्षा घेता येईल. नाहीतर २२, २३ तारखेला परीक्षा उशीरा घेतला येईल,’ असे टोपे यांनी सांगितले.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, केंद्रीय मंत्री राणेंचा पोलिसांनी नोंदवला ऑनलाईन जबाब

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -