घरमुंबईममता बॅनर्जींना मिठी मारेन म्हणणारा तो भाजप नेता कोरोना पॉझिटीव्ह

ममता बॅनर्जींना मिठी मारेन म्हणणारा तो भाजप नेता कोरोना पॉझिटीव्ह

Subscribe

मी कोरोना पॉझिटीव्ह झालो तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन अस म्हणणारा भाजप नेत्याला आता कोरोनाची लागण झाली आहे. भाजपचे पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय सचिव अनुपन हाजरा यांनी स्वतःच फेसबुक पोस्ट करत कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचे जाहीर केले आहे. त्यांना उपचारासाठी कोलकात्यामधील एका खाजगी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.

 

- Advertisement -

Posted by Anupam Hazra on Thursday, October 1, 2020

 

- Advertisement -

अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनुपम हाजरा हे तृणमूलचे माजी खासदार आहेत. त्यांनी जानेवारी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

ममता बॅनर्जींना नेमक काय म्हणाले होते  ?

जर कधी मला कोरोनाची लागण झाली तेव्हा मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नक्कीच मिठी मारेन. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांना कोरोनाने होणारे हाल आणि रूग्णावर काय बेतले जाते याची जाणीव होईल. ज्यांनी आपल्या नजीकच्या व्यक्ती या आजारात गमावल्या आहेत, त्यांच्या दुखःची जाणीव होईल असेही ते म्हणाले.

या विधानानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक मुख्यमंत्र्याविरोधात असे विधान करणे आणि आक्षेपार्ह विधान करणे या कारणासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या रेफ्युजी सेलने केलेल्या तक्रारीनंतर याची दखल घेण्यात आली. दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलिगुरी पोलिस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पण भाजपच्या पश्चिम बंगामधील पदाधिकाऱ्यांनी मात्र याविरोधात कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. अशा महत्वाच्या पदावर जेव्हा तुमची नेमणुक होते, तेव्हा तुम्ही जबाबदारीने बोलायला हवे. भाजपचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी हे विधान केले आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये २ लाख ६० हजार कोरोना रूग्णांची नोंद झाली असून ५ हजार १७ जण मृत्यूमुखी पडले आहेत.


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -