घरटेक-वेकइलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी Tesla भारतात येणार; जाणून घ्या खास गोष्टी

इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी Tesla भारतात येणार; जाणून घ्या खास गोष्टी

Subscribe

इलेक्ट्रिक कारच्या चाहत्यांसाठी खुशखबर असून अमेरिकेची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी Tesla भारतीय बाजारात उतरण्याची तयारी करत आहे. भारतीय याची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. Tesla चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी सूचित केलं आहे की कंपनी पुढील वर्षात भारतात आपला व्यवसाय सुरू करू शकते.

“निश्चितपणे पुढच्या वर्षी” असं एलॉन मस्क यांनी एका ट्विटला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. Tesla Club India ने (अनधिकृत खाते) India Wants Tesla असं लिहिलेलं टीशर्ट पोस्ट केलं आहे. याला उत्तर देताना एलॉन मस्क यांनी निश्चितपणे पुढच्या वर्षी असं म्हटलं आहे. एका वापरकर्त्याने लिहिलं, ‘आम्ही बराच काळ प्रतीक्षा करत होतो.’ यावर एलॉन मस्क यांनी ‘प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद’ असं लिहिलं आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटवरुन पुढील वर्षी टेस्ला इलेक्ट्रिक कार भारतात येणार आहे, असं दिसतंय.

- Advertisement -

महत्त्वाचं म्हणजे काही लोक अजूनही अमेरिकेतून आयात करुन टेस्ला इलेक्ट्रिक कार भारतात वापरतात. त्यामध्ये बॉलिवूड स्टार रितेश देशमुखचाही समावेश आहे. सद्यस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंग स्टेशन तयार करण्यासही सुरुवात केली आहे. बऱ्याच कंपन्या भारतातच इलेक्ट्रिक कार बनवत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही एलॉन मस्कने भारतात येण्याविषयी ट्विट केलं होतं. २०१९ मध्ये त्यांनी पुढच्या वर्षी येण्याविषयी बोललं होतं, परंतु तसं होऊ शकलं नाही. त्यामुळे पुढील वर्षी भारतात टेस्ला येणार आहे की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

- Advertisement -

डिझाईन

टेस्लाच्या सर्व गाड्या इतर वाहनांच्या तुलनेत दिसायला अत्यंत देखण्या आहेत. टेस्ला मार्केट मधील सर्वात स्पोर्टी दिसणाऱ्या इलेक्ट्रॉनिक गाड्या बनवते. टेस्ला Model X या गाडी मध्ये गाडीचे दरवाजे हे वरच्या दिशेने उघडतात अश्या प्रकारे नवनवीन डिझाईन्स वापरत आहे. टेस्ला कार्समध्ये एक मोठी टच स्क्रीन लावली असते जी असंख्य काम करू शकते. अगदी तापमान नियमन करण्यापासून ते गेम्स खेळण्यापर्यंत अनेक गोष्टी त्या स्क्रीन मध्ये करता येतात. बहुतांश कामे या स्क्रीन मधूनच केली जात असल्याने या गाडी मध्ये मोजून ४-५ च बटन्स दिसतील.

टेस्लाच्या सर्व गाड्या विजेवर चालणाऱ्या आहेत. त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांमुळे होणारे प्रदूषण थांबतं. याशिवाय, टेस्लाच्या सर्व गाड्या या नवनवीन टेक्नॉलॉजीने भरलेल्या असतात. या गाडी मध्ये की लेस (Key Less) एन्ट्री आहे. म्हणजेच आपल्याकडे गाडीची चावी जवळ नसली तरी आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या App मधून गाडी उघडू शकतो. सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ऑटोपायलट सिस्टीम. टेस्लाच्या गाड्यांमध्ये ऑटोपायलट ही सुविधा मिळते. ८ कॅमेरे , १२ सुपरसॉनिक सेन्सर्स आणि संगणकाच्या मदतीने या गाड्या ऑटोमॅटिक चालतात.

टेस्लाची सर्वात स्वस्त गाडी (Tesla Model 3) ची अमेरिकेतील किंमत ही ४५ हजार डॉलर (भारतीय ३५-४० लाख रुपये) आहे. ही गाडी भारतात इम्पोर्ट केल्यास सरकारने लावलेल्या प्रचंड करामूळे गाडीची किंमत जवळपास दुप्पट होऊन अंदाजे ७० लाख ते ९० लाख होते. म्हणजेच गाडीच्या किंमती एवढा टॅक्स भारत सरकार आकारतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -