घरमुंबईबीकेसी-चुनाभट्टी पूल वाहतुकीसाठी खुला - देवेंद्र फडणवीस

बीकेसी-चुनाभट्टी पूल वाहतुकीसाठी खुला – देवेंद्र फडणवीस

Subscribe

या कनेक्टरमुळे धारावी आणि सायन जंक्शन दरम्यान होणाऱ्या वाहतुक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी बनवण्यात आलेल्या बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर आज सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या कनेक्टरमुळे धारावी आणि सायन जंक्शन दरम्यान होणाऱ्या वाहतुक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

- Advertisement -

असा आहे बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर

१.६ किलोमीटर लांबीच्या बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टरची रुंदी १७ मीटर असून हा चौपदरी पूल आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ते चुनाभट्टी कॉरिडॉरमुळे ठाणे-नाशिक आणि पनवेल-पुण्याकडे जाणारी वाहतूक सुकर होणार आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेहून आणि कडे जाणार्‍या मार्गावरून सुद्धा गतिमान कनेक्टिव्हीटी प्राप्त होणार आहे. हा उन्नत मार्ग बीकेसी, बाबुभाई कंपाऊंड, सायन सेंट्रल रेल्वे, डंकन कॉलनी, हार्बर लाईन (चुनाभट्टी स्टेशन), सोमय्या मैदान असा असून, मुंबईकरांचे जीवनमान सुकर करण्यासाठी हे आणखी एक पाऊल आहे, अशी माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रवाशांना शुभेच्छा

आज सायंकाळपासून बीकेसी-चुनाभट्टी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबईकरांचे जीवनमान सुकर करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. या मार्गावरुन प्रवास करण्यासाठी माझ्या प्रवाशांना खूप खूप शुभेच्छा असे देखील काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -