घरमुंबईरुग्णालयांमध्ये रक्त तुटवडा, दिवाळी सुट्यांचा फटका

रुग्णालयांमध्ये रक्त तुटवडा, दिवाळी सुट्यांचा फटका

Subscribe

सध्या दिवाळीची सुट्टी सुरु असून मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये रक्त तुटवडा जाणवत असल्याचे समोर आले आहे. दिवाळीआधी फारच कमी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याकारणाने हा तुटवडा भासत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रत्येक सरकारी रुग्णालयांतील रक्त तुटवड्यामुळे योजना आखूनच शस्त्रक्रिया आणि उपचार केले जात आहेत.

सुट्ट्यांच्याकाळात रक्ततुटवडा जाणवतो

केईएम, सायन आणि नायर या पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये अनुक्रमे ११ हजार ३७५ युनिट, ७२५४ युनिट आणि ६५०७ युनिट इतके रक्त संकलन शिबिरांतून करण्यात आले. या रक्त तुटवड्याबाबत विचार करता सण उत्सवांच्या सुट्यांच्या तसेच उन्हाळी सुट्यांच्या काळात रक्त तुटवडा नेहमीच जाणवतो. पण, त्याबाबत आधीच तयारी करावी लागत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते.

- Advertisement -

डॉक्टरांनांच रक्तदानासाठी आवाहन

एका सरकारी रुग्णालयाच्या रक्त पेढी अधिकाऱ्यांच्या मते, रक्त शिबिरे नेहमीच आयोजित केली जातात. तरीही मुंबई सारख्या शहरात रक्ताचा तुटवडा नेहमी जाणवत असतो. मात्र रुग्णालयांना रक्ताची सोय करावीच लागते. तरीही सरकारी रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमधून रक्ताच्या तुटवड्याची बाब नवीन नाही. शाळा-महाविद्यालयांच्या दिर्घकालीन सुट्टीच्या दिवसांमध्ये रक्ताची तीव्र गरज भासते. पण, यंदा वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच रक्त तुटवड्याने महापालिका रुग्णालयांना ग्रासले असून अशा वेळी शिकाऊ डॉक्टरांनाच रक्त दानासाठी आवाहन केले जाते.

“एक ४ वर्षांची मुलगी सध्या केईएम रुग्णालयात ब्लड कॅन्सरसाठी केमोथेरपी घेत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी रुग्णालयाकडून तिच्या आईला रेश्मा आरा (३२) यांना दुसऱ्या रुग्णालयातून तिच्यासाठी प्लेटलेट्स आणायला सांगण्यात आलं. याविषयी रेश्मा आरा यांनी सांगितलं की, ” रक्ताचा तुटवडा आहे पण, नशीबाने जे.जे रुग्णालयाच्या रक्तपेढीतून आम्हाला प्लेटलेट्स मिळाले.”

२०० ते २५० रक्तपिशव्या ठेवाव्या लागतात

सरकारी आरोग्यदायी योजना, रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागातून रक्तांसाठी प्रशस्तीफोन आणि राजकीय व्यक्तिंचा दबाव अशी रक्ताच्या तुटवड्यांची कारणे देखील वारंवार समोर आली आहेत. कित्येक वेळा निवासी डॉक्टरांकडून रक्तदान करण्यात येत असल्याचेही तिन्ही प्रमुख रुग्णालयांचे प्रशासनाकडून माहिती मिळाली आहे. कोणत्याही सरकारी निमसरकारी रुग्णालयात तात्काळ २०० ते २५० रक्ताच्या पिशव्या तत्पर ठेवाव्या लागतात. जननी सुरक्षा योजनेतील रुग्णांना, राजीवगांधी योजनेतील रुग्णांना, थॅलेसेमिया, अॅनेमिया सारख्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याचे सरकारचे आदेश आहेत. अशा रुग्णांना रक्तपुरवठा करताना इतर गरजू रुग्णांसाठी मात्र रक्ताची तजवीज करण्यासाठी सरकारी रक्तपेढ्यांना वेळी अवेळी रक्तदान शिबिरे भरवावी लागतात.

- Advertisement -

खासगी रक्तपेढीतून रक्त आणावे लागते

रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णालयांमध्ये होणाऱ्या बहुतांश सर्व शस्त्रक्रिया, प्रसुतीच्या वेळी, थॅलेसेमियाचे रुग्ण, अॅनेमियाचे रुग्ण, यांना रक्ताची नितांत गरज असते. मात्र, कित्येकवेळा अत्यंत गरजू रुग्णांना खासगी रक्तपेढीतून रक्त आणण्याचे सुचवण्यात येते. खासगी रक्तपेढीतील एक रक्त पिशवी ८०० ते २५०० रुपयांमध्ये खरेदी करावी लागते. त्यामुळे राज्यासह मुंबईतील रुग्णालयांतील रक्तपेढींची अवस्था सध्या दयनीय झाली आहे.

याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितलं की, ” सुट्ट्यांच्या काळात रक्तदाते फिरायला जातात. त्यामुळे शिबीरं ही कमी प्रमाणात भरवली जातात. त्यातून रक्ताचा तुटवडा भासतो. आम्ही दिवाळीआधी वेगवेगळ्या संस्थांना, रुग्णालयांना रक्तदान शिबीरे घेण्याबाबत सुचवतो. पण, कधी कधी कमी प्रतिसाद मिळतो. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -