घरमुंबईरेल्वेवर महापालिकेची शेकडो कोटींची थकबाकी

रेल्वेवर महापालिकेची शेकडो कोटींची थकबाकी

Subscribe

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर महापालिकेच्या २३३ कोटी ९० लाख ९२ हजार ९६२ रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेने मध्य आणि पश्चिम रेल्वेला डिफॉलटर म्हणून घोषित केले आहे.

सामान्य मुंबईकराने जर दोन ते तीन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका तुमची जलजोडणी खंडीत करते. परंतु, महानगरपालिका शासकीय विभागावर महेरबान आहे. कारण मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागाकडे पाण्याच्या तब्बल २३३ कोटी ९० लाख ९२ हजार ९६२ रुपयांची थकबाकी आहे. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेलासुद्धा पालिकेने डिफॉलटर यादीत टाकले आहे.

मध्य रेल्वेच्या ६७ तर पश्चिमच्या ५५ जलजोडण्यांचा समावेश

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मांगावली होती. त्यानंतर जन माहिती अधिकारी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी शकील अहमद शेख यांना माहिती दिली. या माहितीत मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे महापालिकेची तब्बल २३३ कोटी ९० लाख ९२ हजार ९६२ रुपयांची थकबाकी आहे. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण १२२ जलजोडणीला डिफॉलटर यादीत टाकले आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या ६७ जलजोडण्यांच्या समावेश आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या ५५ जलजोडण्याच्या समावेश आहे. मध्य रेल्वेच्या तब्बल १०३ कोटी १८ लाख ५६ हजार १२४ रुपयांची थकबाकी आहे. तर पश्चिम रेल्वेच्या तब्बल १३० कोटी ७२ लाख ३६ हजार ८३८ रुपयांची थकबाकी आहे.

- Advertisement -

मंत्र्यांच्या बंगल्यांचेही होते कोट्यवधींचे थकबाकी

यापूर्वी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण ८ कोटींची थकबाकी होती. त्यामुळे या बंगल्यालाही पालिकेने डिफॉलटर यादीत टाकले होते. याबाबत बातमी आल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागांनी जवळपास सर्व थकबाकीचे पैसे मनपाकडे भरले होते. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामन्य जनतेने का भरावे? तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सारख्या रेल्वे विभागालाही पाण्याची थकबाकीचे पैसे भरणार का? असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -