घरमुंबईBMC Budget 2020 - उपनगरवासियांनाही आता केईएम,नायर,शीव रुग्णालयांप्रमाणे सेवा

BMC Budget 2020 – उपनगरवासियांनाही आता केईएम,नायर,शीव रुग्णालयांप्रमाणे सेवा

Subscribe

उपनगरीय रुग्णालयांचे रुपांतर सीपीएस/एफ.सी.पी.एस व डी.एन.बीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम देणाऱ्या पदव्युत्तर केंद्रांमध्ये करण्यात येणार असून आता उपनगरातील रुग्णालयांचेही रुपांतर वैद्यकीय महाविद्यालय सदृश्य रुग्णालयांमध्ये होणार आहे. त्यामुळे, उपनगरातील रुग्णांनाही आता वैद्यकीय महाविद्यालयांसारखीच वैद्यकीय आणि शल्य चिकित्सा सेवा मिळणार आहे.

उपनगरीय रुग्णालयांचे रुपांतर सीपीएस/एफ.सी.पी.एस व डी.एन.बीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम देणाऱ्या पदव्युत्तर केंद्रांमध्ये करण्यात येणार असून आता उपनगरातील रुग्णालयांचेही रुपांतर वैद्यकीय महाविद्यालय सदृश्य रुग्णालयांमध्ये होणार आहे. त्यामुळे, उपनगरातील रुग्णांनाही आता वैद्यकीय महाविद्यालयांसारखीच वैद्यकीय आणि शल्य चिकित्सा सेवा मिळणार आहे. पश्चिम उपनगरातील ३ रुग्णालयांमध्ये तसेच पूर्व उपनगरातील ३ रुग्णालयांमध्ये डी.एन.बी. पाठ्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी पूर्व वेळ कंत्राटी तज्ञ वैद्यकीय सल्लागारांच्या नेमणुका करण्यात येतील,अशी घोषणा महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केली.

किटक नाशक विभागाचे खासगीकरण –

मुंबईतील कचरा उचलण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देऊन त्यांचे खासगीकरण केल्यांनतर आता किटकनाशक विभागामार्फत धुम्र फवारणीचे काम खासगी संस्थेमार्फत करून घेतले जाणार आहे. परिमंडळ ४ मध्ये प्रायोगिक तत्वावर किटकनाशके फवारणीचे काम खासगी संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी घोषित केले आहे.

- Advertisement -

बायोमेडिकल साधनांची देखभाल खासगी कंपनीमार्फत –

पुढील वर्षांपासून बायोमेडिकल साधनांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कामे ट्रायमेड सोल्युशन कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी ३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यामध्ये विविध रुग्णालयांमधील ४ हजार ५०० बायोमेडिकल साधनांची देखभाल केली जाणार आहे.

पशुवैद्यकीय विभागासाठी ३९.९६ कोटींची तरतूद – 

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पशुवैद्यकीय विभागासाठी ३९. ९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये देवनार आणि मालाड येथे जनावरांची शवदाहिनी उभारण्यात येत आहेत. तसेच महालक्ष्मी येथे प्राण्यांची शवदाहिनी, सर दोराबजी टाटा ट्रस्ट माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी ८.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, देवनार पशुवधगृहासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • रुग्णालये, आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी – ३८२.१९ कोटी रुपये
  • गोवंडी शताब्दी रुग्णालयाचा पुनर्विकास – ५०२ कोटी रुपये
  • राजावाडी रुग्णालय निवासी वैद्यकीय वसतीगृह – १५.२२ कोटी रुपये
  • बोरीवली भगवती रुग्णालय – ५९२ कोटी रुपये
  • मुलुंड एम.टी.अग्रवाल रुग्णालय – ४५७ कोटी रुपये
  • वांद्र भाभा रुग्णालय – २८७ कोटी रुपये
  • केईएम रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह – १०.०३ कोटी रुपये
  • लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी – ६५० कोटी रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -