घरताज्या घडामोडीBMC Budget 2022 : राज्य सरकारने थकवले पालिकेचे 6768.16 कोटी

BMC Budget 2022 : राज्य सरकारने थकवले पालिकेचे 6768.16 कोटी

Subscribe

विविध योजना राबवण्यासाठी राज्य सरकारकडून पालिकेला अनुदान देण्यात येते. मात्र, राज्याकडून देण्यात येणार्‍या अनुदानापैकी तब्बल 6768.16 कोटींचे अनुदान अद्याप पालिकेला मिळालेले नाही. राज्य शासनाकडून पालिकेला थकबाकी 6768.16 कोटी येणे बाकी आहे. 

मुंबई महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज म्हणजे 3 फेब्रुवारीला सादर करण्यात येत आहे. पालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेय. राज्य सरकारच्या विविध योजना पालिकेच्या अनेक विभागाकडून राबवण्यात येतात. या योजना राबवण्यासाठी राज्य सरकारकडून पालिकेला अनुदान देण्यात येते. मात्र, राज्याकडून देण्यात येणार्‍या अनुदानापैकी तब्बल 6768.16 कोटींचे अनुदान अद्याप पालिकेला मिळालेले नाही. राज्य शासनाकडून पालिकेला थकबाकी 6768.16 कोटी येणे बाकी आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी  31 डिसेंबर 2021 पर्यंत 6768.16 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. ज्यामध्ये राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी 4840.61 कोटी रुपये येणे असलेल्या रकमेचा अंतर्भाव आहे. मुंबई महानगरपालिकेस देय असलेल्या रकमांच्या वसुलीबाबत / समायोजनेबाबत मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण बजेट ३,३७० कोटींचे

यंदाच्या बजेटमध्ये महानगरपालिकेनं मुलांना डिजिटल शिक्षण देण्यावर भर दिला आहे. यासाठी लागणाऱ्या गोंष्टींची खरेदी करण्यासाठी निधीती तरतूद करण्यात येणार आहे. मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. व आय. बी शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे बजेट ३ हजार ३७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून २०२२-२३ आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २८७०.२४ कोटी तर उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजे २७१०.७७ कोटी आहे.


हे ही वाचा – BMC Budget : विद्यार्थ्यांना अत्याधुनिक टॅब पुरवणार ; 7 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -