घरताज्या घडामोडीमुंबई महानगरपालिकेचं कर्मचाऱ्यांसाठी बंपर गिफ्ट! मिळणार १५,५०० दिवाळी बोनस!

मुंबई महानगरपालिकेचं कर्मचाऱ्यांसाठी बंपर गिफ्ट! मिळणार १५,५०० दिवाळी बोनस!

Subscribe

मुंबई महानगर पालिकेने अखेर पालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या आधी बंपर गिफ्ट जाहीर केलं आहे. पालिका कर्मचाऱ्यांसाठी २०१९-२० या वर्षासाठी १५ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्याची घोषणा महानगर पालिकेकडून करण्याता आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत महानगर पालिकेमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मुंबई महानगर पालिकेकडून खुशखबर मिळाली आहे. यामध्ये पालिका कर्मचारी, शाळेतील शिक्षक-कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका अशा वेगवेगळ्या श्रेणींसाठी ही घोषणा करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कर्मचाऱ्यांना मागील वर्षांच्या तुलनेत ५०० रुपयांनी वाढ करून देण्याची तयारी दर्शवली होती.

bmc letter about bonus

- Advertisement -

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार समय वेतनश्रेणीतील कामगार-कर्मचाऱ्यांना १५ हजार ५००, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील कर्मचारी-शिक्षकांना ७ हजार ७५०, शिक्षण खात्याच्या मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना ४ हजार ७०० तर अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना २३५० रुपये इतका बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याशिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविका अर्थात CHV यांना भाऊबीज भेट म्हणून ४ हजार ४०० रुपये देण्यात येणार आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक मुंबई महानगर पालिकेकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी कामगार संघटनांच्या समवय समितीने तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या वेळी महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे याबाबत सोमवारी २ नोव्हेंबर रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सानुग्रह अनुदान देण्याची अधिकृत घोषणा केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी महापौरांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

कोविडच्या काळात महापालिकेच्या अत्यावश्यकसह बिगर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्यामुळे आज कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्यात तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून रुग्णांच्या मृत्यूचे तसेच रुग्णवाढीचे प्रमाण कमी करण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -