घरCORONA UPDATEबेस्ट व्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव, विरोधी पक्षांनी केली सभागृहात मागणी

बेस्ट व्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव, विरोधी पक्षांनी केली सभागृहात मागणी

Subscribe

बेस्ट महाव्यवस्थापक हे लोकप्रतिनिधींचा अपमान करत असून ते पदाचा गैरवापर करत असल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला जाणार आहे. महापालिकेतील विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभागृह बोलावण्याची मागणी महापौरांकडे केली आहे. त्यांना त्वरित पदावरून दूर हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. कोरोनाच्या लॉक-डाउनच्या काळात सर्व दुकाने, कारखाने, कंपन्या आदी बंद असल्याने कुणीही घराबाहेर पडू शकत नव्हते. त्यावेळी सर्व व्यवहार ठप्प असताना प्रत्यक्ष वीज मीटरची नोंद न घेता बेस्ट उपक्रमाने निवासी सदनिका धारकांना आणि व्यावसायिक आस्थापनांना विजेचा वापर केला नसतानाही भरमसाठ शुल्क आकारून विजेची बिले पाठवली.

‘बेस्ट व्यवस्थापक पदांचा गैरवापर करतायत’

लॉक-डाऊन मुळे व्यावसायिकांचे आणि सर्व सामान्यांचे उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. त्यातच बेस्ट उपक्रमाकडून वीज ग्राहकांवर भरमसाठ बिल आकारत आहे. त्यामुळे वीज ग्राहक हवालदिल झाले आहेत. परिणामी असंतोषाची लाट उसळली आहे. मात्र, याची दखल बेस्ट व्यवस्थापकांनी घेतली नाही आणि या संदर्भातील त्यांची भेट घेऊ इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही ते वेळ देत नाहीत. त्यामुळे ते पदाचा गैरवापर करत एकप्रकारे लोकप्रतिनिधींचा अवमानच करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या या महाव्यवस्थापकांना त्वरित हटवून त्यांची अन्य ठिकाणी बदली करण्याची मागणी रवी राजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु त्यानंतरही त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. त्यानंतरही त्यांच्याकडून लोकप्रतिनिधींचा अवमान करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळे अखेर रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख व जावेद जुनेजा या चार स्थायी समिती सदस्यांच्या स्वाक्षरीने त्यांनी बेस्ट महाव्यवस्थापक यांना पदावरून दूर करून शासनाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी त्यांनी करत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी सभागृह बोलावण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे रवी राजा हे बेस्ट समितीचे सर्वांत जुने सदस्य आहेत. शिवाय विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना महाव्यवस्थापकांनी भेट नाकारत एकप्रकारे महापालिकेच्या आयुक्तांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -