घरमुंबईबिल्डरांना दिलासा! मुंबई महापालिका करणार बांधकामाच्या ठिकाणी अळीनाशक फवारणी

बिल्डरांना दिलासा! मुंबई महापालिका करणार बांधकामाच्या ठिकाणी अळीनाशक फवारणी

Subscribe

इमारत बांधकामाच्या ठिकाणी मुंबई महापालिकेतर्फे खासगी संस्थेतर्फे 'अळीनाशक फवारणी' करण्यात येत आहे.

मुंबईत शहर आणि उपनगरांमध्ये शेकडो इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात डासांची निर्मिती होण्याची भीती असते. डास चावल्याने मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे इमारत बांधकामाच्या ठिकाणी मुंबई महापालिका खासगी संस्थेतर्फे ‘अळीनाशक फवारणी’ करण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने सद्गुरू कृपा सेवा सहकारी संस्था (मर्या.) या संस्थेच्या स्वयंसेवकांची मदत घेतली आहे. या संस्थेला एफ/उत्तर विभागातील सायन, वडाळा, माटुंगा आदी भागातील इमारत बांधकामांच्या ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यास ७ महिन्यांच्या कालावधीकरता ३० स्वयंसेवकांचा पुरवठा करण्यासाठी ४८ लाख ६९ हजार रुपये मोजण्यात येणार आहेत.

एफ/दक्षिण विभागात परळ, हिंदमाता, शिवडी आदी परिसरांतील इमारत बांधकामांवर ‘अळीनाशक फवारणी’ करण्यासाठी ६ महिन्यांचे ४८ लाख ४९ हजार रुपये मोजण्यात येणार आहेत. या ‘अळीनाशक फवारणी’वर एकाच संस्थेला जवळजवळ १ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. वास्तविक, एफ/उत्तर विभागात या कामासाठी १२ संस्थांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. तर एफ/दक्षिण विभागात याच कामासाठी १७ संस्थांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र, सद्गुरू कृपा सेवा सहकारी संस्थेला (मर्या.) दोन्ही विभागातील काम देण्यात आले.

- Advertisement -

पूर्वी ही ‘अळीनाशक फवारणी’ बिल्डरांना स्वतःच्या यंत्रणेमार्फत करावी लागत असे. त्यामुळे बिल्डरांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे बिल्डरांनी ही जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर टाकली. मात्र, त्यासाठीचा खर्च प्रथम पालिका करणार आणि नंतर तो खर्च बिल्डर पालिकेला अदा करणार असे ठरले. तेव्हापासून वरीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -