घरमुंबई'मुंबईत रहायला कुणाच्या परवानगीची गरज नाही', कंगनानं सेनेला पुन्हा डिवचलं

‘मुंबईत रहायला कुणाच्या परवानगीची गरज नाही’, कंगनानं सेनेला पुन्हा डिवचलं

Subscribe

कंगनाने शिवसेनेला पुन्हा एकदा केले टार्गेट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. दरम्यान, कंगना राणौत ही मंगळवारी मुंबईतील श्री सिद्धीविनायक बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. बाप्पाच्या दर्शनासाठी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती.

यावेळी कंगनासह तिची बहिण रंगोली चंदेल ही देखील उपस्थितीत होती. श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर कंगनाने उपस्थितांना ‘जय महाराष्ट्र’ ही केला. यासह “मला मुंबईत रहायला कुणाच्या परवानगीची गरज नाही’, असं म्हणत कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधत सेनेला डिवचले आहे.

- Advertisement -

असं म्हणाली कंगना…

“मला मुंबईत रहायला कुणाच्या परवानगीची गरज नाही, मी कुणाकडे परवानगी मागितली नाही. माझ्यासाठी केवळ बाप्पाचा आशिर्वाद आणि त्याची परवानगी महत्त्वाची आहे”, अस म्हणत कंगनाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

यावेळी प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी विचारणा केली. तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगना रणौतने त्यावर बोलायचे टाळले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर अशी केल्याने कंगना चांगलीच चर्चेत ठरली होती. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी कंगानाला चांगलेच फटकारले होते. यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या वांद्रे पश्चिम येथील कार्यालय तोडले होते. त्यावरूनही बराच वाद झाला होता. त्यानंतर कंगना हिमाचल प्रदेशमध्ये होती. यासर्व प्रकारानंतर कंगना पुन्हा रविवारी मुंबईत परतली होती. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कंगना आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य रविवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -