घरमुंबईशाळेचे प्रवेशद्वारचं बनले चिमुरड्याच्या मृत्यूचे कारण

शाळेचे प्रवेशद्वारचं बनले चिमुरड्याच्या मृत्यूचे कारण

Subscribe

शाळेचं प्रवेशद्वार (गेट) अंगावर पडल्यानं १२ वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. काल नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील महापालिकेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत सौरभ सुनील चौधरी या पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे हे प्रवेशद्वार कोसळलं तेव्हा तेथील सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचं सौरभच्या मित्रांनी म्हटलं आहे.
सौरभ या लोखंडी गेटजवळ खेळत असताना गेट कोसळलं. त्याच्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप सौरभच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली.
महापालिकेने ४० कोटी रुपये खर्च करून शाळेची इमारत बांधली असून, त्या इमारतीमधील शाळा जूनमध्ये सुरू होणार होती. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने इमारतीचे बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेत सौरभचा मृत्यू झाला तर निलेश देवरे (वय १३) हा विद्यार्थी जखमी झाला.

नेमकं काय घडलं
निलेश व सुरेश पालिका शाळेच्या आवारात क्रिकेट खेळत होते. यावेळी शाळेच्या आवारातच रिक्षा उभी करण्यासाठी एका रिक्षाचालकाने शाळेचे लोखंडी गेट उघडले. परंतु त्याने ते गेट बंद न केल्याने सौरभ व त्याचे मित्र ते गेट बंद करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. यावेळी हा लोखंडी गेट त्यांच्या अंगावर कोसळला.

- Advertisement -

हॉस्पिटलची जीवघेणी दिरंगाई
सौरभ आणि त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच दोघांना वाशीतील पालिका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु सौरभची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला फोर्टिजमध्ये हलवण्यात यावे, डॉक्टरांनी सुजवले. त्यानुसार सौरभचे नातेवाईक त्याला जखमी अवस्थेत फोर्टिज हॉस्पिटल घेऊन गेले. मात्र तेथे बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी पालिकेतून पाठवले असून सौरभची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून देखील त्याला दाखल करून घेण्यात उशीर केला गेला. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने सौरभ याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचे मामा संतोष पाटील यांनी केला. तसेच शाळेच्या गेटचे काम नित्कृष्ट झाल्याने तो कोसळून हा अपघात घडला. या प्रकरणी ठेकेदारावर देखील कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -