Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दाऊदचा आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या युसूफ लकडावालाचा आर्थररोड जेलमध्ये मृत्यू

दाऊदचा आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या युसूफ लकडावालाचा आर्थररोड जेलमध्ये मृत्यू

Related Story

- Advertisement -

बिल्डर आणि चित्रपट निर्माता युसुफ लकडावालाचा (Yusuf Lakdawala) आर्थर रोड (Arthur road jail) जेलमध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी युसूफ लकडावालाला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पण आज युसुफ लकडावालाचा मृत्यू झाला आहे. युसुफवर आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करून अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा आर्थिक व्यवहार सांभाळल्याचा आरोप लकडावालावरती लावण्याला गेला आहे.

खंडाळ्यातील हैदराबाद नवाबाच्या ५० कोटी रुपयांच्या जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रे बनविल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबईचे बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट निर्माता युसुफ लकडावालाची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर युसुफला ईडीकडून अटक करण्यात आली. याप्रकरणात ट्रायल सुरू असताना लकडावालाला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. इथेच त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले. काल, बुधवारी रात्री युसुफला त्रास झाल्यामुळे जे.जे रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला गेला. पण जेजे रुग्णालयातील डॉक्टराचे मत आहे की, युसुफला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आता यापुढे युसुफच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जाणार आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील मावळ तहसील अंतर्गत खंडाळ्यातील ५० कोटी रुपयांच्या जमीनचे बनावट कागदपत्र केल्याने आणि फसवणूक केल्यामुळे मुंबईत पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेद्वारे २०१९मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता, ज्याच्या आधारे ७६ वर्षीय लकडावाला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच यापूर्वी अभिनेत्री साधना यांना २०१० मध्ये सांताक्रुजमधील जमिनीसाठी धमकावल्याप्रकरणी युसुफ लकडावालाविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र याप्रकरणात लकडावालाची निर्दोष मुक्तता झाली होती.


हेही वाचा – Drug case : ड्रग्ज प्रकरणी बाहुबली फेम ‘राणा दग्गुबाती’ची ७ तास चौकशी


- Advertisement -