Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भुजबळांविरोधात हायकोर्टात जाणार, अंजली दमानियांचं वक्तव्य

भुजबळांविरोधात हायकोर्टात जाणार, अंजली दमानियांचं वक्तव्य

कधी ना कधी राष्ट्रवादीचा गरज पडेल म्हणून भाजपने ट्रायल सुरु होऊ दिले नाही.

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे अंजनी दमानिया यांनी म्हटलं आहे. सर्व राजकारणी एकाच माळेचे मनी असल्यामुळे भुजबळांविरोधात तत्कालीन भाजप सरकारने ट्रायल सुरु केली नाही. ट्राय सुरु केली असती तर निर्णय लवकर झाला असता असा आरोपही अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह सर्व राजकारण्यांवर केला आहे. भुजबळांना एका प्रकरणात क्लिन चीट मिळाली आहे परंतु उर्वरित ७ प्रकरणं न्यायालयासमोर आणणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे. अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, आमदार आणि खासदारांच्या विरोधात असलेल्या केसेसचा तातडीने १२ महिन्याच्या आत निर्णय व्हायला हवा असे सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर असताना भाजप सरकारने ट्रायल सुरु होऊ दिले नाही. ट्रायल सुरु न होऊ देण्यामगचे कारण समोर आलं पाहिजे. त्यावेळी युतीत असून शिवसेना सारखी धमकी द्यायची की आमच्या खिशात आमचे राजीनामे आहेत. कधी ना कधी राष्ट्रवादीचा गरज पडेल म्हणून भाजपने ट्रायल सुरु होऊ दिले नाही. जर हे ट्रायल सुरु झालं असतं तर ते १२ महिन्यात सुनावणी होऊन पुर्ण झालं असते. आणि सगळे चार्जशीटमधले मुद्दे मांडले गेले असते. पण तसं न करता २०१६ च्या केसचे डिश्चार्ज अॅप्लिकेशन २०२१ मध्ये आणि त्या डिश्चार्ज अॅप्लिकेशनमधील ७ पैकी १ महाराष्ट्र सदनात दिलासा मिळाला आहे. पण ही क्लीन चीट नव्हे. ह्याच्याविरोधात मी हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.

दमानियांना कुठेही जाण्याची मोकळीक – भुजबळ

- Advertisement -

अंजली दमानिया यांनी हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा दिल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय कुठे जायचं आहे तिकडं त्यांनी खुशालं जावं पण मुळात या प्रकरणातील एका एका गोष्टीची शहानिशा ही सत्र न्यायालयातच होतो. सत्र न्यायालयाने ती शहानिशा केली आहे. त्यामुळे आता अंजली दमानिया यांनी कुठे जायचं त्यांनी जावं त्यांना पुर्ण मोकळीक आहे. लोकशाहीमध्ये अधिकार आहे. असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. एसीबीने न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांचा अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्याला मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : छगन भुजबळांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!


 

- Advertisement -